1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जून 2018 (08:59 IST)

वैमानिकाचे कौतुक, शेकडो जीव वाचवले

Praise of the pilot
मुंबईतील घाटकोपरच्या पश्चिम भागात चार्टर विमान कोसळून वैमानिकासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अपघातात मृत्यू पावलेल्या वैमानिकाचं कौतुक होत आहे. कारण विमान कोसळणार हे लक्षात आल्यानंतर त्यानं प्रसंगावधान राखत ते विमान बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर उतरवलं. अन्यथा मोठी जीवित आणि वित्तहानी झाली असती. मुख्य वैमानिक मारिया कुबेर आणि सहवैमानिक प्रदीप राजपूत अशी या वैमानिकांची नावं आहेत. 
 
विमानाचं लँडिंग करताना हे विमान कोसळलं. मात्र असं असलं तरी वैमानिकानं प्रसंगावधान राखत विमान रहिवासी इमारतीवर न जाऊ देता मोकळी जागा दिसेल अशा ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. याच वेळी ते विमान सर्वादय रुग्णालय परिसरातील जीवदया लेनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या भागात कोसळलं. पण हे विमान रहिवासी इमारतीवर कोसळले असते तर त्यात शेकडो जीव मृत्यूमुखी पडले असते. वैमानिकाच्या एका निर्णयामुळे हे सारे टळले.