गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (09:56 IST)

#Shweta : श्‍वेता हे तू काय केलंस, माईक तर बंद केला असता !

अरे श्‍वेता हे काय करतेय, अग्ग माईक तर बंद कर. श्वेता योर माइक इज ऑन... श्‍वेता हे काय बोलतेय... अरे कोणी तर कॉल करा तिला आणि सांगा की तिचा माईक ऑन आहे...
 
दोन मुली एका व्यक्तीबद्दल अत्यंत खाजगी बोलत असताना तिचा माईक ऑन राहतो आणि मीटिंगसाठी ऑनलाइन असणार्‍या सुमारे 100 लोकांना त्यांच्या गोष्टी ऐकू जातात. ते अनेकदा तिला माईक बंद करायला म्हणतात पण तिला कोणाचाही आवाज येत नसतो आणि ती सेक्स आणि रिलेशनबद्दल बिंदास बोलत राहते.
 
Shweta ट्वीटरवर ट्रेंड (Twitter Trend) झाली कारण तिने ऑनलाइन मीटिंग दरम्यान आपल्या मैत्रीणीशी बिंदास गप्पा मारल्या पण आपला माईक ऑफ करणं विसरली. श्वेता आपल्या राधिका नावाच्या मैत्रीणीसोबत अफेअर, सेक्स आणि रिलेशनशिपबद्दल बोलत होती. सोबतच ती हेदेखील सांगत होती, की त्यानं हे सीक्रेट फक्त माझ्यासोबत शेअर केलं आहे. हे सीक्रेट आपल्या मैत्रिणीला सांगताना चुकून माईक ऑन होता आणि तिची हे सीक्रेट आता 111 लोक ऐकून चुकले होते.
 
त्यांच्या चर्चे दरम्यान अनेक जणांनी श्वेता माईक बंद कर, असंही सांगितलं. मात्र, किस्सा सांगण्यात मग्न असणाऱ्या श्वेताला हे ऐकू येत नव्हतं. तिचे हे संभाषण रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केलं गेलं. यानंतर गुरूवारी श्वेता ट्वीटरवर टॉप ट्रैंडिंगमध्ये आली. आता यावर भयंकर मीम्स बनत आहे. 
 
श्वेतानं फोनवर बोलताना म्हटलं की तिनं ही गोष्ट स्वतःच्या बेस्ट फ्रेंडलाही सांगितली नाही. मात्र, मला सांगितली त्यावर ऑनलाइन एकाने कमेंट देखील केलं की आता ही गोष्ट 111 अजून लोकांना ‍माहित पडली आहे.
 
श्वेताचं लीक झालेला हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर श्वेताच्या नावानं मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. 
 
येथे ऐका संपूर्ण संभाषण