बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 25 जून 2018 (15:02 IST)

चक्क १३ वर्षे एकही सुट्टी घेतली नाही

हिमाचल प्रदेशातील रोडवेज कंपनीत काम करणाऱ्या जोगिंदर सिंह (जोगी) या कर्मचाऱ्याने नोकरीला लागल्यापासून गेली १३ वर्षे एकही सुट्टी घेतली नाही. हिमाचल राज्य परिवहन मंडळात वाहक म्हणून कार्यरत आहे. विशेष असे की, जोगिंदर सिंह केवळ साप्ताहिक सुट्टीच नव्हे तर, सण, उत्सवांसाठी मिळणारी सुट्टीही घेत नाहीत. प्रतिदिन ते ऑन ड्यूटीच असतात. त्यामुळे जोगिंदर यांच्या खात्यावर केवळ साप्ताहिक मिळणाऱ्या ३०३ सुट्ट्या जमा आहेत. ज्या त्यांनी कंपनीला दान रूपात दिल्या आहेत. जोगींच्या या कार्याबद्दल रोडवेजन कंपनीने २०११ मध्ये त्यांना विशेष सन्मानित केले होते.
 
हिमालचल प्रदेशातील सिरमौर कला संगम नावाच्या एका संस्थेने जोगिंदर सिंह यांना त्यांच्या या अनोख्या कार्याबद्धल पुरस्कार देऊन सन्मानित केले. पण, हा पुरस्कार स्विकारण्यासाठीही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या वतीने त्यांच्या वडिलांनी हा पुरस्कार स्विकारला.