पैशांमध्ये मोजता न येणारी वाजपेयी यांची श्रीमंती
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनऊ येथून लोकसभेची निवडणूक लढविताना निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे ५८ लाख रूपये संपत्ती होती. वाजपेयी यांचे स्टेट बँकमध्ये दोन अकाऊंट होते. त्यातील एका अकाऊंटमध्ये २० हजार रुपये तर दुसऱ्या अकाऊंटमध्ये ३ लाख ८२ हजार ८८६ रुपये ४२ पैसे एवढी रक्कम होती. याच बँकेच्या अजून एका अकाऊंटमध्ये २५ लाख ७५ हजार ५६२ रुपये ५० पैसे एवढी रक्कम होती.
वाजपेयी यांनी आपल्याकडील संपत्तीचा नेहमीच समाजासाठी वापर केला होता. त्यांच्या आग्रा येथे राहणाऱ्या बहिणीकडे गॅस नव्हता तर, खासदारांना गॅस कनेक्शनचा कोटा असतो, पण त्या कोट्यातून त्यांनी बहिणीला गॅस दिला नव्हता आणि त्यांनीही कधी मागितला नाही. ‘अपने दम पे खडे रहो, नही तो भांग पीकर पडे रहो’’ असे त्यांचे सांगणे असे.
अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले हाते की, ‘‘१९८७ मध्ये किडनीच्या आजाराने त्रस्त असताना त्यांच्याकडे अमेरिकेत जाऊन उपचार करण्यासाठीही पैसे नव्हते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वाजपेयी यांना उपचारासाठी मदत केली होती. राजीव गांधींनी केल्या मदतीसाठी त्यांनी अनेक सार्वजनिक सभांमध्ये त्यांचे याबद्दल आभारही मानले होते.