Marathi Biodata Maker
✕

लग्न मंडपांत महिलेची नवरदेवाला मारहाण

Updated: शुक्रवार, 17 मार्च 2023 (14:04 IST)
उत्तर प्रदेशातील ऐटा येथे फसवणूक करून दुसरं लग्न करणाऱ्या दोन मुलांच्या बापाला पहिल्या बायकोने चांगलीच अद्दल घडवली. फसवणूक करून दुसरं  लग्न करणाऱ्या कपिंजल यादव यांना पोलिसांनी अटक केली आहे. 
मिळालेल्या माहितींनुसार, ऐटा येथे आलेल्या कपिंजल यादवचे पहिले लग्न मोठ्या थाटामाटात श्वेता यादव हिच्याशी झाले. श्वेताच्या वडिलांनी लग्नात मोठा खर्च केला असून वराला 20 लाख रुपये देखील दिले होते. कपिंजलला श्वेतापासून दोन मुली  देखील आहेत. काही दिवसांनंतर श्वेताच्या सासरच्या मंडळीच्या वागण्यातून बदल दिसू लागला श्वेता आपल्या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी आली.

श्वेता माहेरी गेल्यावर तिच्या सासरच्या मंडळींनी कपिंजलचे दुसरे लग्न करण्याचे योजिले आणि त्याप्रमाणे  ऐटा येथे लग्न ठरवलं .15 मार्च रोजी वरात घेऊन कपिंजल लग्न मंडपात पोहोचला.लग्नाचे विधी होत असताना कपिंजलची पहिली पत्नी श्वेता तिच्या भावांसह आली आणि तिने लग्नाचा विरोध केला . रागाच्या भरात येऊन श्वेता आणि तिच्या भावांनी वराला मारहाण केली आणि गोंधळ घातला. आपल्या मुलीची फसवणूक होत आहे हे पाहून नवी नवरीच्या पित्याने पोलिसांना बोलवून तोतया नवरदेवाला पोलिसांच्या ताब्यात दिले. 
 
Edited By- Priya Dixit 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

जालना येथे उड्डाणपुलावरून एक अनियंत्रित कंटेनर ढाब्यावर कोसळून दोघांचा मृत्यू

LIVE: विदर्भात पावसाची शक्यता, या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा

दिल्लीतील रॅलीला प्रत्युत्तर म्हणून भाजप ५ नोव्हेंबर रोजी नागपूरमधील आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत

नागपूर पोलिसांची कारवाई: शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल फसवणूक करणाऱ्यां ८ जणांना अटक

ट्रम्प प्रशासनाला न्यायालयाने निवडणुकीतील हस्तक्षेप आणि मतपत्रिका रोखण्यावर बंदी घातली

पुढील लेख
Show comments