Daily Horoscope
✕

चवळी लागवड कशी करावी? कमी खर्चात घ्या भरघोस उत्पादन!

Updated: शनिवार, 12 सप्टेंबर 2026 (16:32 IST)
१. हवामान आणि जमीन
हवामान: चवळीच्या पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान उत्तम मानले जाते.
जमीन: मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू (pH) ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.

२. सुधारित वाण (Varieties)
कोकण सदाबहार: हिरव्या शेंगांसाठी उत्तम वाण.
पुसा कोमल: कीड आणि रोगांना बळी न पडणारी जात.
पुसा फाल्गुनी: कमी दिवसांत (६०-६५ दिवस) तयार होणारी जात.
C-152: धान्यासाठी उत्तम मानली जाणारी जात.

३. पेरणी आणि बियाणे
पेरणीची वेळ:
खरीप: जून ते जुलैचा पहिला आठवडा.
उन्हाळी: फेब्रुवारी ते मार्च.
बियाण्याचे प्रमाण: हेक्टरी १२ ते १५ किलो बियाणे लागते.
अंतर: दोन ओळींत ४५ सेंमी आणि दोन रोपांत १५ सेंमी अंतर ठेवावे.
बीजप्रक्रिया: पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम थिराम किंवा कॅप्टन, आणि १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धन लावावे.

४. खत आणि पाणी व्यवस्थापन
खत व्यवस्थापन: जमिनीची मशागत करताना हेक्टरी ५ ते ६ टन शेणखत मिसळावे. पेरणीच्या वेळी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.
पाणी व्यवस्थापन: खरीप हंगामात पावसाच्या अंदाजानुसार पाणी द्यावे. उन्हाळी पिकासाठी जमिनीच्या प्रकारानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

५. काढणी आणि उत्पादन
भाजीच्या शेंगांसाठी पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांत पहिली काढणी करता येते.
धान्यासाठी शेंगा पूर्ण वाळल्यावर (७५ ते ९० दिवसांत) काढणी करावी.
उत्पादन: हिरव्या शेंगांचे उत्पादन हेक्टरी ८० ते १०० क्विंटल, तर धान्याचे उत्पादन १० ते १५ क्विंटलपर्यंत मिळते.
ALSO READ: भरपूर नफा मिळवून देणारी सुधारित पद्धतीने पालकाची लागवड कशी करावी, याची संपूर्ण माहिती
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: ब्रोकोली लागवड माहिती: सुधारित वाण, खत व्यवस्थापन व उत्पादन
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: कांदा लागवड तंत्रज्ञान: लागवडीपासून कांदा चाळीपर्यंतची ए टू झेड माहिती

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

न्यूझीलंडविरुद्धच्या 'अ' सामन्यांमधून ऋषभ पंत बाहेर, या यष्टीरक्षकाचा समावेश

हसन महमूद कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला बांगलादेशी वेगवान गोलंदाज ठरला

माझी बदली झालेली नाही, भेसळखोरांविरुद्धचा लढा सुरूच राहणार”; तुकाराम मुंडे यांनी बदलीच्या वृत्तांवर केला खुलासा

LIVE: महाराष्ट्रात किसान कर्ज माफी योजनेअंतर्गत ३.५१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुंबईच्या धारावीचा कायापालट होणार, १०,४३२ घरांच्या बांधकामाला सुरुवात

पुढील लेख
Show comments