Festival Posters
✕

Oilseed Crops: तेलबिया पिके कोणती आहे जाणून घ्या सविस्तर माहिती

Updated: मंगळवार, 8 सप्टेंबर 2026 (14:19 IST)
प्रमुख तेलबिया पिके आणि त्यांचे प्रकार
सोयाबीन : महाराष्ट्रातील खरिपातील सर्वात प्रमुख तेलबिया पीक. यात तेलाचे प्रमाण १८-२०% आणि प्रथिनांचे (Protein) प्रमाण जास्त असते.

भुईमूग : खरीप आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामांत भुईमुगाची लागवड केली जाते. याच्या बियांमध्ये ४५-५०% तेलाचे प्रमाण असते.

सूर्यफूल: हे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामांत घेता येते. हृदयासाठी सूर्यफूलाचे तेल अत्यंत उत्तम मानले जाते.

करडई : रब्बी हंगामातील हे महत्त्वाचे कोरडवाहू पीक आहे. कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळते.

तीळ : खरीप व उन्हाळी हंगामात तीळ पेरला जातो. तिळाच्या तेलाचा वापर औषधी आणि अन्नप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर होतो.

मोहरी/राई : रब्बी हंगामात कमी तापमानात हे पीक घेतले जाते. उत्तर आणि मध्य भारतात मोहरीची मोठ्या प्रमाणावर लागवड होते.

एरंडी : याच्या तेलाचा वापर प्रामुख्याने औद्योगिक, औषधी आणि ग्रीसिंग उत्पादनांमध्ये केला जातो.

खुरासणी / कारळे : हे एक महत्त्वाचे कोरडवाहू तेलबिया पीक आहे, जे प्रामुख्याने आदिवासी व डोंगराळ भागात घेतले जाते.
ALSO READ: कमी पाण्यात येणारी ही ५ पिके शेतकऱ्यांसाठी ठरतायत फायदेशीर
तेलबिया पिकांचे महत्त्व
आर्थिक फायदा: तेलबिया ही नगदी पिके असल्याने शेतकऱ्यांना यातून त्वरित आणि चांगले आर्थिक उत्पन्न मिळते.
उपउत्पादने (पेंड): तेल काढल्यानंतर उरलेली पेंड गुरांसाठी अत्यंत पोषक ढेप/खाद्य म्हणून वापरली जाते.
कमी पाण्याची गरज: करडई, तीळ आणि खुरासणी यांसारखी पिके कमी पाण्याखाली आणि कोरडवाहू जमिनीत सहज येतात.
ALSO READ: ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांनी कोणती पिके आणि कामे प्राधान्याने करावीत?
Edited By- Dhanashri Naik<>

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: नाशिकमध्ये आदिवासी लोकांनी गोदावरी आरती गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला

नाशिकमध्ये ६,५०० आदिवासी लोकांनी गोदावरी आरती गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला

नाशिक सिंहस्थ कुंभाप्रसंगी एकनाथ शिंदे म्हणाले "३५,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने सुविधांमध्ये परिवर्तन घडवले जाईल"

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी खात्यात ₹५,००० जमा होण्यास सुरुवात झाली

नागपूरमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला

पुढील लेख
Show comments