Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बारमाही उत्पन्न देणारे फळपीक; चिकू लागवड

Updated: सोमवार, 20 जुलै 2026 (22:14 IST)
क्रिकेट बॉल: या जातीची फळे आकाराने मोठी आणि गोल असतात. फळात गर दाणेदार आणि कमी गोड असतो.
छत्री: या झाडाचा आकार छत्रीसारखा पसरतो. फळ खूप गोड असते.
 
३. लागवडीची पद्धत आणि अंतरकलमांची निवड: 
चिकूची कलमे घेताना ती 'खिरणी' (रिफा/रायाण) या जंगली झाडाच्या खुंटावर 
केलेली असावीत. अशी कलमे जोमदार वाढतात आणि जास्त काळ टिकतात.
 
लागवडीचे अंतर: चिकूचे झाड मोठे आणि पसरणारे असल्याने सामान्यतः १० बाय १० मीटर (३३ बाय ३३) फूट  खड्डे घ्यावेत. (एकरमध्ये साधारण ४० ते ४2 झाडे बसतात).
ALSO READ: कमी खर्चात आणि कमी कालावधीत बंपर उत्पन्न! गाजराची यशस्वी लागवड माहिती
खड्ड्याचा आकार: १ बाय १बाय  १बाय मीटर आकाराचे खड्डे उन्हाळ्यात खणावेत. त्यात चांगली माती, शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेट भरून पावसाळ्याच्या सुरुवातीला कलम लावावे.
 
४. खत आणि पाणी व्यवस्थापन
पाणी: झाड लहान असताना हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी आणि उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धत चिकूसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
 
खते: लागवडीनंतर पहिल्या वर्षी प्रति झाड २० किलो शेणखत, ४०० ग्रॅम युरिया, ६०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि २०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. झाड जसे मोठे होईल तशी खताची मात्रा वाढवावी. 
 
५. फळधारणा आणि उत्पन्नउत्पादन कधी सुरू होते?: 
कलमी झाडांना तिसऱ्या-चौथ्या वर्षापासून फळे येण्यास सुरुवात होते. मात्र, ५ ते ६ व्या वर्षापासून व्यावसायिक उत्पादन मिळते.
 
बहार: चिकूला वर्षभर फुले येतात, पण मुख्य उत्पादन सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या दोन हंगामात (बहार) जास्त मिळते.
ALSO READ: अत्यंत फायदेशीर आणि हमखास उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय; मिरची लागवड
उत्पन्न: एका पूर्ण वाढलेल्या १० ते १२ वर्षांच्या झाडापासून वर्षाला १५०० ते २००० फळे (सुमारे १५० ते २०० किलो) सहज मिळतात. चिकूचे झाड ६० ते ८० वर्षांपर्यंत चांगले उत्पन्न देऊ शकते.
 
नवीन लागवड केल्यानंतर पहिल्या २ वर्षांत झाडाचा आकार चांगला येण्यासाठी आणि मुख्य खोड मजबूत होण्यासाठी खालून येणारे फुटवे वेळोवेळी छाटून टाकावेत.
ALSO READ: आले लागवड: अद्रक शेतीतून हमखास बंपर नफा मिळवण्याची संपूर्ण माहिती
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

LIVE: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय: पुणे आणि रत्नागिरी दरम्यान ६ गणेश चतुर्थी विशेष गाड्या धावणार

पुण्यात एमपीएससी भरती प्रक्रिया आणि परीक्षांमधील अनियमिततेच्या निषेधार्थ उमेदवारांचा 'आक्रोश मार्च'

एकही रुपया खर्च न करता एका फांदीपासून मनी प्लांट कसे वाढवावे, योग्य पद्धत जाणून घ्या

'पांढरे सोने' पिकवा समृद्ध व्हा: कापूस लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन

मुंबई ते मराठवाडा ४ तासांत! ४४२ किमी लांबीच्या कल्याण-लातूर जनकल्याण द्रुतगती मार्गाला मंजुरी

पुढील लेख
Show comments