Dharma Sangrah
✕

कमी खर्चात आणि कमी कालावधीत बंपर उत्पन्न! गाजराची यशस्वी लागवड माहिती

Updated: सोमवार, 6 जुलै 2026 (16:38 IST)
खरीप हंगाम: जून ते जुलै.
उन्हाळी हंगाम: फेब्रुवारी ते मार्च (डोंगराळ किंवा थंड हवेच्या भागात).
 
सुधारित जाती
आशियाई जाती (स्थानिक): पुसा केशर (गडद लाल), पुसा मेघाली, चंतनी (नारंगी).
परदेशी जाती (युरोपीय): नँटीज (Nantes), इम्पेरेटर (या जाती प्रामुख्याने थंड हवामानात येतात).
 
लागवड पद्धत
पूर्वमशागत: जमीन २-३ वेळा उभी-आडवी नांगरून भुसभुशीत करून घ्यावी आणि हेक्टरी १५-२० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
पेरणी: गाजराची लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी-वरंब्यावर केली जाते. सरी-वरंब्यावर लागवड केल्यास गाजराची लांबी चांगली वाढते.
बियांचे प्रमाण: एक हेक्टरसाठी अंदाजे ५ ते ६ किलो बियाणे लागते. बियाणे अतिशय बारीक असल्याने त्यात बारीक वाळू किंवा माती मिसळून पेरणी करावी. दोन ओळीत ३० सेमी आणि दोन रोपांत १० सेमी अंतर ठेवावे.
 
खत आणि पाणी व्यवस्थापन
पाणी: पेरणी केल्याबरोबर लगेच हलके पाणी द्यावे. गाजराची पूर्ण वाढ होईपर्यंत जमिनीच्या मगदुरासार ७ ते १० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. पाण्याचा ताण पडल्यास गाजराला तडे जातात.
खत: पेरणीच्या वेळी नत्र, स्फुरद आणि पालाशची शिफारशीत मात्रा द्यावी. लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी उरलेला नत्राचा हप्ता द्यावा.
 
आंतरमशागत आणि काढणी
विरळणी आणि खुरपणी: बियाणे उगवून आल्यावर १५-२० दिवसांनी विरळणी करावी (दाट झालेली रोपे काढावीत). पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे आहे.
काढणी: जातीनुसार ८० ते १०० दिवसांत गाजर काढणीस तयार होते. काढणीपूर्वी वाफ्याला हलके पाणी द्यावे, जेणेकरून गाजरे उपटणे सोपे होते आणि ती तुटत नाहीत.
उत्पादन: योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति हेक्टरी २५ ते ३० टन उत्पादन सहज मिळू शकते.
ALSO READ: बाजारात वर्षभर चांगली मागणी असलेल्या भेंडीची लागवड करणे अतिशय सोपे
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: कांदा लागवड तंत्रज्ञान: लागवडीपासून कांदा चाळीपर्यंतची ए टू झेड माहिती
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: वर्षभर चांगला भाव मिळतो; शिमला मिरची लागवड प्रचंड नफा मिळवून देणारा व्यवसाय
About Author
धनश्री नाईक
गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या धनश्री नाईक सध्या 'वेबदुनिया'च्या मराठी विभागात कनिष्ठ संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांव्यतिरिक्त स्थानिक समस्या आणि घडामोडींना व्यासपीठ मिळवून देण्याकडे धनश्री यांचा कटाक्ष असतो. तळागाळातील बातम्या सोप्या भाषेत मांडणे हे.... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात एक लाख भगवे झेंडे फडकवले जाणार

नांदेडमध्ये १.०२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹८६१.५६ कोटी जमा; कर्जमाफीच्या तीन याद्या जाहीर

भंडारा येथे विजयादशमीच्या उत्सवात 'महाप्रसाद' खाल्यानंतर ४०० जण आजारी तर १६ जणांची प्रकृती गंभीर

नागपूर: आई-वडिलांमधील वादामुळे १२ वर्षीय मुलाने उचलले टोकाचे पाऊल; कुटुंबावर शोककळा

छत्रपती संभाजीनगरमध्ये अंतिम न्यायालयीन सुनावणीच्या दिवशी दिवसाढवळ्या तरुणाची हत्या

पुढील लेख
Show comments