Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Khandobachi Aarti श्री खंडोबा आरती संग्रह

Updated: बुधवार, 26 नोव्हेंबर 2025 (07:56 IST)
जय देव जय देव शिवमार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा ॥ धृ. ॥
 
मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।
त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥
नाटोपे कोणास वरे मातला ।
देवगण गंधर्व कांपती त्याला ॥ जय. ॥ २ ॥
 
चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।
चरणी पृष्ठी खंङ्‌गें वर्मी स्थापीसी ।
अंती वर देउनि त्या मुक्तीते देशी ॥ जय. ॥ ३ ॥
 
मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्लारी ।
देवा संकट पडतां राहे जेजुरी ॥
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।
देवा ठाय मागे दास नरहरि ॥ जय. ॥ ४ ॥

************************************* 

जय देवा खंडेराया । निजशिवरुप सखया ॥
आरती ओवाळीतो । भावभंडारसुप्रीया ॥ धृ. ॥
 
देहत्रय गड थोर । हेचि दुर्घट जेजूर ।
तेथे तूं नांदतोसी ॥ आत्मसाक्षित्वे निर्धार ॥
उन्मनी म्हाळसा हे । शांतिबाणाई सकुमार ।
भुक्ति मुक्ति दया क्षमा । मुरळ्या नाचती सुंदर ॥ जय. ॥ १ ॥
 
स्वानंद अश्व थोर त्यावरि बैसोनि सत्वर ॥
अद्वैतबोध तीव्र । हाती घेउनि तरवार ॥
अहंकार मल्लासूर । त्यातें मारिसी साचार ॥
निवटुनी दैत्यगार । विजयी होसी तूं मल्हार ॥ जय. ॥ २ ॥
 
निरसोनी द्वैत भाव । करिसी तूं ठाणे अपूर्व । अद्वैतची भक्तदेव ।भेदबुद्धी मिथ्या वाव ।
तुजवीण न दिसे कोणी । जगिं या एकचि तू धणी ॥
मौनी म्हणे तुची सर्व । अससी व्यापक खंडेराव ॥ जय देवा. ॥ ३ ॥

************************************* 
पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥
मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥
 
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥
 
सुरवरसंवर वर दे मजलामी देवा ।
नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥
अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
 
फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ २ ॥
 
रघुवीरस्मरणी शंकर ह्रुदयीं निवाला ।
तो हा मल्लांतक अवतार झाला ॥
यालागीं आवडे भाव वर्णीला ।
रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव.॥ ३ ॥

************************************* 

श्री खंडोबा महाराज तळी आरती
॥ जय मल्हार ॥
बोल खंडेराव महाराज की जय॥
सदानंदाचा येळकोट ॥
 
येळकोट येळकोट जय मल्हार॥
हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥
भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥
सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥
निळा घोडा॥ पाई तोडा॥
कमर करगोटा ॥ बेंबी हिरा॥
गळयात कंठी॥ मोहन माळा॥
 
ङोईवर शेला॥ अंगावर शाल॥
सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥
शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥
आरती करी॥ देवा ओवाळी ॥
नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥
कोठ लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥
भंडाऱ्याचा भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय मल्हार॥
 
********************
 
आगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी ।
निळा घोडा, पाव में तोडा ।
मस्तकी तुरा, बेंबी हिरा ।
अंगावर शाल, सदाही लाल ।
म्हाळसा सुंदरी, आरती करी ।
 
खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भंडका ।
बोला सदा आनंदाचा येळकोट
खंडेराव महाराजकी जय
हर हर महादेव
चिंतामणी मोरया
आनंदीचा उदय उदय
भैरीचा चांग भले
सदानंदाचा येळकोट
खंडेराव महाराज की जय
हर हर महादेव
चिंतामणी मोरया
चिंतामणी मोरया
आनंदाचा उदय उदय
भैरीचा चांग बले
सदानंदाचा येळकोट
खंडेराव महाराज कि जय
 
********************
बोल खंडेराव महाराज की जय॥
सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय म ल्हार॥
हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥
भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥
सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥
निळा घोडा॥ पाई तोडा॥
कमरी करगोटा ॥ बेंबी हिरा॥
गळयात कंठी॥ मोहन माळा॥
अंगावर शाल॥ सदा हिलाल॥
जेजुरी जाई॥ शिकार खेळी॥
म्हाळसा सुंदरी॥ आरती करी॥
देवा ओवाळी ॥ नाना परी॥
देवाचा श्रृंगार ॥ कोठ लागो शिखरा॥
खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका॥
बोल सदानंदाचा येळकोट ॥
येळकोट येळकोट जय मल्हार॥
 
********************

सर्व पहा

Pithori Amavasya 2026 पिठोरी अमावस्या २०२६ कधी? तारीख, पूजा विधी, व्रत आणि पौराणिक कथा जाणून घ्या

गोगा नवमी २०२६: जाहरवीर गोगादेवांचे ५ अद्भुत चमत्कार – श्रद्धाळूंना थक्क करणारे अनुभव

या ४ प्रकारच्या लोकांना चुकूनही कधीही सल्ला देऊ नका; चाणक्य सांगतात तुम्ही अडचणीत येऊ शकता

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा

जन्माष्टमी २०२६: बाळगोपाळाला अर्पण करा 'हे' प्रिय नैवेद्य; 'या' ५ व्या भोगाशिवाय पूजा मानली जाते अपूर्ण!

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments