बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. आरती संग्रह
Written By
Last Updated : गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (13:56 IST)

आरती तुळजा भवानीची

जयदेव जयदेव जय विश्वंभरिते । 
आरती ओवाळू तुळजे गुणसरिते ॥ धृ. ॥
सुरवरदायिनी मुरहरसुखसदना । 
परत: परवासिनी अरिवर कुलकदना ॥
व्यापक सर्वांघटी जननी हे मदना ।
करुणासागररुपें नांवें शशिवदना ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय विश्वंभरिते ।
आरती ही ओंवाळूं तुज कृपावंते ॥ धृ. ॥
मुनिजनमन मोहिनी सकळांची जननी ।
जनमन मज्जनसज्जनिविज्जन तमशमनी ।
दासां अभ्यंतरी मान समुदुशयनी ।
राघववरदा सुंदरलाघव मृगनयनी ॥ जय. ॥ २ ॥