Dharma Sangrah
✕

साप्ताहिक राशीफल 22 ते 28 ऑक्टोबर 2018

Updated: शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (13:45 IST)
 
कर्क : प्रकृतीच्या तक्रारींकडेही लक्ष ठेवावे लागेल. नियोजनबद्धतेने प्रगती करता येईल. कोणत्याही कामाचा दबाव न घेता ते काम तुम्ही हसत खेळत पार पाडाल. सभोवतालची परिस्थिती खूप आशादायक वाटेल. पण प्रत्यक्षात मात्र तुमची दगदग, धावपळ कमी होणार नाही. तुम्हाला करीयर, नोकरी व्यवसाय अथवा व्यक्तिगत जीवनात बरेच वेगवेगळे अनुभव येण्याची शक्यता आहे. कोणतीही महत्त्वाकांक्षा न बाळगता जर तुमचे काम मर्यादेत राहून केलेत तर त्याचा त्रास होणार नाही. 
 
सिंह : प्रकृतीच्या जुन्या तक्रारींवर उपाय मिळू शकेल. घरामधे पूर्वी लांबलेल्या शुभकार्याची नांदी होईल. ज्यांनी तुम्हाला सहकार्याचे आश्वासन देऊन निराशा केली होती त्यांच्याकडून आता थोडीशी का होईना मदत मिळेल. बुडत्याला काडीचा आधार असे समजून त्याचा फायदा घ्या. व्यापार उद्योगात उत्पन्नाचे नवीन साधन शोधण्याचा विचार कराल. नोकरीमध्ये बराच तणाव देणारे काम आटोक्यात येईल. 
 
कन्या : या आठवडय़ात नोकरीव्यवसायापेक्षा घरगुती जबाबदारीवर तुमचे लक्ष केंद्रीत होईल. जीवनाचा आनंद घ्याल. जीवन गतिमान बनेल. गुरू राशीच्या षष्ठस्थानात प्रवेश करेल. या स्थानातील गुरू प्रकृती आणि स्पर्धा या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यायला भाग पाडतो. जर त्यासंबंधी काळजी घ्या. पुढील वर्षभर व्यापारीवर्गाने स्वत:ची मर्यादा सोडू नये. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेत राहणे चांगले. घरातील नैतिक जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील.
 
तूळ: तुम्ही नेहमीच्या कामाबरोबर कर्तव्यपूर्तीचा आणि जीवनाचा आस्वाद घेण्याचा आनंद अनुभवू शकाल. नोकरीमधे पगारवाढ आणि बढती मिळेल. त्याबरोबर कामाचा व्यापही वाढेल. व्यवसाय धंद्यचा विस्तार होईल. सांसारिक जीवनातील सुखद प्रसंगाची नांदी होईल. तरुणांचे विवाह जमून पार पडतील. नवविवाहितांच्या घरात पाळणा हलेल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. 
 
वृश्चिक : या आठवडय़ात मनाप्रमाणे वागण्याचे समाधान लाभेल. घरामध्ये शुभकार्याच्या निमित्ताने पाहुण्यांची ये-जा राहील. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार न करता येणाऱ्या क्षणाचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल याचा विचार कराल. तरुणांना स्थिरता लाभून सांसारिक जीवनात पदार्पण होईल. नोकरी व्यवसायातील कामकाज सुरळीत चालल्याने शांतचित्ताने काम करू शकाल. स्वत:च्या वास्तूत राहावयास जाण्याचा योग येईल. विद्यार्थ्यांनी मात्र आळस करून चालणार नाही. 
 
धनू : नोकरीमध्ये नवीन जबाबदारीकरता निवड होईल. त्याचे चांगले फायदेही मिळतील. परदेशात जाण्याचा योगही येईल. जबाबदारी आणि कामाचा तणाव इतका प्रचंड असेल की कधीकधी नको त्या सवलती असे वाटेल. घरामधे एखादी मोठी नैतिक जबाबदारी पार पाडावी लागेल. या आठवडय़ात अनेक लांबलेली कामे तुम्ही संपवाल.
 
मकर : वास्तविक सहसा कोणतेही नवीन प्रयोग करून पहाणे तुमच्या तत्त्वात बसत नाही. पण या आठवडय़ात अधिक यश अधिक पैसा मिळविण्याच्या इच्छेने काही नवे प्रयोग करून पहावेसे वाटतील. पूर्वीही तुमच्या आर्थिक आणि इतर स्वास्थ्यात त्याने चांगली भर टाकली होती. या आठवडय़ात व्यापार उद्येगात खर्च वाढले तरी नवीन मोठे काम मिळण्याची आशा निर्माण होईल. घरामधे शुभकार्य ठरेल/पार पडेल.
 
कुंभ : तुमच्यामध्ये एक रसिक व्यक्ती किंवा कलाकार दडलेला असतो. एखाद्या निमित्ताने ते तुम्ही प्रदर्शित करता तेव्हाच इतरांना त्याची जाणीव होते. या आठवडय़ात अशी संधी मिळेल. व्यवसाय धंद्यात आर्थिक किंवा इतर चिंता निर्माण झाली असेल तर हितचिंतकांच्या मदतीमुळे ती कमी होईल. गरजा भागवण्याइतके पैसे हातात पडतील. पण फार मोठी मनोरथे रचू नका. गृहसौख्यात भर पडेल.
 
मीन : प्रत्येक बाबतीत स्वत:वर र्निबध ठेवणे आवश्यक आहे. त्यात चूक झाल्यास त्याचा आर्थिक आणि इतर स्वरूपात भरुदड सहन करावा लागेल. व्यक्तीगत जीवनातही सर्व काही चांगले दिसत असून एकप्रकारचे मानसिक असमाधान राहील. आपल्या मर्यादेत राहून काम करा. नोकरीमध्ये कामाचा वेग या आठवडय़ात उत्तम राहील. अवघड उद्दीष्ट पार कराल. व्यापारातील कामाचा व्याप वाढेल. घरगुती जीवनात सर्वाना खूश ठेवण्याची मनीषा पूर्ण होईल. आवडत्या छंदामुळे मौजमजा येईल.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments