suvichar

ऑक्टोबर 2019चे राशी भविष्यफल

Updated: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (08:21 IST)
कर्क : तुम्ही चिंतित राहाल. शत्रू पक्ष तुमच्यावर हावी होऊ शकतो. भौतिक साधनांवर निरर्थक पैसे खर्च होण्याची चिन्हे दिसत आहेत. लक्षात असू द्या, क्रोध सगळ्यात आधी तुमचे नुकसान करतो, म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात संशय घातक ठरू शकतो. या विषयावर जोडीदारासोबत चर्चा करून तोडगा काढा. बाहेर खाणे टाळा, नाहीतर आरोग्यावर याचे वाईट परिणाम दिसून येतील. तुमच्या हुकूमशाही वागण्यामुळे तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागेल. काही नवे सुरू करणे टाळा. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. गुंतवणूक करण्याआधी जाणकारांचा सल्ला घ्या. 

सिंह : या महिन्यात तुमच्यासाठी सर्वकाही सामान्य राहील. नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक ठरतील. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जाऊ शकता. अड्कलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल. जोडीदाराचे तुमच्याप्रतीचे वागणे साहाय्यकारी असेल. स्पर्धेला घाबरू नका, त्याचा आनंद लुटा. मग पाहा काम करताना किती मजा येते ती. धार्मिक कृत्यांप्रती रूची वाढवा. कोणीतरी जुना साथीदार किंवा नातेवाईक सुदैवाने भेटू शकतील. बदलत्या वातावरणाने आजारी पडण्याची लक्षणे आहेत, सावध राहा. चिकित्सकाजवळ जाणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल. जोडीदाराचे तुमच्याप्रतीचे वागणे साहाय्यकारी असेल.  

कन्या : तुमच्या जीवनात काहीतरी नवे होणार आहे. वाटेत काही अडचणी येतील पण तुम्ही त्या पार कराल. कुटुंबात वातावरण ठीकठाक राहील. यात्रेचा लाभ होईल. नव्या संबंधांचा फायदा होईल. ऑफिसमध्ये सह-कर्मचारींचे वागणे सहाय्यभूत ठरेल. कुठे तरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. जोडीदारासोबत खास क्षण घालवू शकाल. विदेश प्रवासाचा योग आहे. मिळकतीचे नवे मार्ग खुलतील. तुमचे शांत चित्त तुम्हाला अनेक त्रासांपासून वाचवेल. जोडीदाराची साथ मिळेल. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल. 

तुळ : जुनी थांबलेली कामे मार्गी लागतील. कोणालाही खोटे आश्वासन देऊ नका तुम्हाला इच्छेनुसार फळ मिळेल. पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनाही फायदा होईल. विरोधक शांत राहतील. जोडीदार प्रसन्न आणि अपत्य संतुष्ट राहतील. एकुणच तुमच्यासाठी हा चांगला महिना आहे. कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे. यासाठी आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करा. मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. काही लोकं तुमची प्रतिमा खराब करु शकतात. शेजारी तुम्हाला सहकार्य करतील. धनाचे योग सामान्य आहेत. धार्मिक कार्यात वेळ दिल्यामुळे लाभ होईल. आविवाहितांच्या जीवनात प्रेमाची झुळूक येऊ शकते. दान दिल्यामुळे लाभ होईल. 

वृश्चिक : महिना साधारण आहे. स्वास्थ्य ठीक-ठाक राहील. जोडीदाराची साथ मिळेल. तुमच्या बोलण्याचा मान राखला जाईल. धार्मिक कार्यात आवड वाढेल. तब्येत ठीक करण्यासाठी सकाळी फिरायला जावे. विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल वेळ. मनासारखी स्थळं न मिळाल्याने निराशा राहील. वडील आणि भावाशी वाद होतील. वाहन चालवताना अति-दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मद्यपान करताना संयम ठेवा. यश टिकवण्यासाठी आळसाचा त्याग करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात निरसता येत आहे, जोडीदारच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. शत्रू तुमच्या बेजबाबदार वागण्याचा फायदा उचललील. आर्थिक पातळीवरही परिस्थिती सामान्य राहील.

धनु : सर्व काही ठीक चालले आहे. लहानमोठया समस्या सोडल्या तर हा महिना उत्तम चालला आहे. तुमच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. नवे वाहन किंवा घर वगैरे खरेदी करु शकता. मित्र प्रत्येक अडचणीत तुमची साथ देतील. सासरच्या लोकांकडून साहाय्य मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. कम्प्यूटर व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगली असरणार आहे. शत्रूंची प्रत्येक चाल अयशस्वी ठरेल. विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ आहे. मनासारखे फळ मिळेल. शत्रू प्रयत्न करतील, पण त्यांना तुमचे नुकसान करता येणार नाही. नोकरीत परिस्थिती साधारण राहील. तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल, जर तुम्ही त्यासाठी तयार असाल. मित्र मदतीसाठी पुढे येतील.

मकर : या महिन्याच्या सुरुवातीत गुरूचा उदय होईल आणि त्याच्या प्रभावामुळे तुमच्या भाग्याचा उदय होईल. भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. मिळकतीचे नवे मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. जुन्या समस्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत. नव्या संपर्कांचा फायदा होईल. भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. मिळकतीचे नवे मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. जुन्या समस्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत. नव्या संपर्कांचा फायदा होईल. वेळ प्रतिकूल आहे. होणारी कामे बिघडू शकतात. तुम्हाला असे वाटेल की सर्वजण तुमच्या विरोधात आहेत. मित्रांचे वागणेही खटकेल. अपेक्षित फळ न मिळाल्याने विद्यार्थ्यांना निराशा येईल. कुटुंबातील लोकांमुळे तुम्हाला विपरीत स्थितिचा सामाना करावा लागणार आहे. 

कुंभ: या वेळेस तुम्ही मित्र आणि भाऊ बहिणींसोबत फिरायला जाण्याचा प्रोग्रॅम बनवाल. तुमचे शत्रू तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. व्यापार-संबंधित लोकांना नुकसान होऊ शकते. असे झाले तरी तुम्हाला वरिष्ठ लोकांचे आणि कुटुंबातील मोठयांचे भरपूर साहाय्य मिळेल. नकोसे खर्चही वाढू शकतात. नव्या जबाबदार्‍या मिळू शकतात. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मिळकतीचे स्त्रोत वाढतील. धनप्राप्तीचे योग आहेत. सामाजिक कार्यात तुम्ही सतत तत्पर राहाल. कोणीतरी तुम्हाला आपलेपणा दाखवून धोका देण्याच्या विचारात आहे. काही लोकांसाठी हे मनाजोगे नसेल. जोडीदार मजबूत स्तंभासारखा तुमच्यासोबत उभा ठाकेल. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. विद्यार्थी जातक जे खासकरून सृजनात्मक आणि रचनात्मक विषयांशी जुळलेले आहे ते उत्तम प्रगति करतील.  

मीन : या महिन्यात प्रेम-प्रसंग विवाहापर्यंत पोहोचण्याचे योग आहेत. आई-वडीलांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष द्या, नाहीतर ते नाराज होऊ शकतात. पण व्यवस्थित समजवल्याने त्यांची नाराजी दूर होऊ शकते. स्वास्थ्य उत्तम राहील. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा. हवेत प्रेम आहे. त्याचा फायदा घ्या. नोकरीत त्रास होईल. आर्थिक स्तरावर त्रासात राहू शकता, जोडीदाराचे वागणेही तुम्हाला त्रासात टाकू शकते. हा आठवडा तुम्हाला मिळता-जुळता असेल. रागात तुम्ही तुमचेच नुकसान करुन घ्याल. इतर लोक तुमचा राग तुमच्या विरुद्धच हत्यारासारख्या वापरण्याची शक्यतो आहे. कुठलाही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. आर्थिक बांधणीवर विशेष चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. या वेळेस मित्र आणि मोठ्या लोकांच्या मदतीची अपेक्षा ठेवू शकता. 

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments