ganesh chaturthi

जाणून घ्या तुमचे साप्ताहिक भविष्यफल

Updated: शनिवार, 20 जुलै 2019 (16:59 IST)
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात लाभदायक स्वरूपाच्या घडामोडी घडतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीत राहतील व वेळेवर सहकार्य मिळेल. कोणत्याही बाबतीत अपयशाचा सामना करावा लागणार नाही. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहील. अंतिम चरणात नियोजित खर्चापेक्षा अधिक प्रमाणात खर्च करावा लागेल. कर्ज प्रकरणातून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. 
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या व प्रश्न मनोनुकूलरीत्या मिटतील. व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नोकरीत अधिकारीवर्गाची मर्जी आपल्यावर पूर्णपणे राहून त्यांनी सोपविलेली कामगिरी आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होईल. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात राहू शकेल. अंतिम चरणात अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. 
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक स्वरूपाचा प्रवासयोग जुळून येईल. प्रवास कार्यसाधक ठरेल. सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील. अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. यशस्वितेसाठी केलेले अथक परिश्रम सार्थकी ठरतील. अंतिम चरणात उद्योग क्षेत्रातील करार व्यवहार गतिमान होऊन मनोनुकूलरीत्या पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत मिळतील.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहनापासून धोका संभवतो. हातातील कामात विविध प्रकारचे अडथळे येतील. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे उचित ठरेल. भावी काळात होणारा परिणाम काही प्रमाणात हितावहच ठरू शकेल. शांतता व संयम ठेवणेच चांगले राहील. अंतिम चरणात महत्त्वपूर्ण कामाच्या बाबतीत करावा लागणारा प्रवास कार्य यशस्वितेचाच सिद्ध होईल. 
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर येईल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. आपले मार्गदर्शन सहकारी वर्गासाठी विशेष लाभदायक स्वरूपाचे ठरेल. मानसिक शांतता टिकून राहून काळजीचे सावट दूर होऊन उत्साह वाढेल. अंतिम चरणात सर्वत्र सावधानता ठेवूनच वाटचाल करणे हितप्रद ठरेल. कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक विश्‍वासून राहणे भावी काळाच्या दृष्टीने अडचणीचेच ठरेल. 
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्य चांगले राहील व आरोग्याच्या सर्व समस्या मनोनुकूलरीत्या मिटण्याच्या दृष्टिक्षेपात येतील. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती पूर्वपदावर येऊन उत्साह वाढेल. मानसिक शांतता टिकून राहू शकेल. अंतिम चरणात कार्यसभोतालीन परिस्थिती सहकार्य मिळवून देणारी राहील. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गावर राहतील. आनंद वाढेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेसह सर्व प्रकारच्या परीक्षेत यश मिळेल. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. आर्थिक गुंतवणुकीवरील फायदे मिळतील व आर्थिक गुंतवणूक भावी काळाच्या दृष्टीने फायदेशीरच ठरेल. मानसिक समाधान लाभेल. अंतिम चरणात विरोधक मंडळीच्या कारवाया थांबतील. विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करण्याचा प्रय▪जारी करतील. आरोग्याच्या तक्रारी मिटण्याच्या मार्गावर राहतील.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढेल. मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. कौटुंबिक वातावरण मानसिक समाधान मिळवून देणारे राहील. पारिवारीक सदस्याबरोबर असणारे मतभेद मिटतील. यश समोर दिसेल. अंतिम चरणात संततीबाबत आनंदवार्ता येतील. आर्थिक आवक समाधानकारक स्थितीत राहील. हातात पैसा खेळता राहील. 
 
मीन :  सप्ताहाच्या प्रथम चरणात अपेक्षितरीत्या सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात नावलौकिक मिळवून देणारी कामगिरी हातून घडेल. कलावंत व्यक्तीचा इतरांकडून उचित मानसन्मान गौरव सोहळा आयोजित केला जाईल व मानसिक सुख लाभेल. अंतिम चरणात पारिवारीक सदस्य मनोनुकूलरीत्या व अपेक्षितरीत्या मदतीचा हात पुढे करतील. कार्य सभोतालीन परिस्थिती चांगली राहील. कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही. यशाचा मार्ग खुला राहील.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments