सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2019
Written By
Last Modified: शनिवार, 6 जुलै 2019 (16:40 IST)

साप्ताहिक राशीफल 7 ते 13 जुलै 2019

मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. विरोधक मंडळींचा त्रास व ससेमिरा मिटण्याच्या मार्गावर राहील व यशस्वीतेचा मार्ग खुलाच राहून अपेक्षित यश मिळू शकेल. अंतिम चरणात नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर येईल. सहकारीवर्ग अपेक्षे इतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहील व अपूर्ण व स्थगीत व्यवहार सुरळीतपणाच्या मार्गावर येतील.
 
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून अपेक्षित स्वरूपाचा लाभ मिळेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नवीन भागीदारी प्रस्ताव स्वीकारावा, हितावह व लाभप्रद ठरेल व यश मिळेल. अंतिम चरणात विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल व जवळ आलेले यश दूर जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत इतरावर अधिक विश्‍वासून राहणे अडचणीचेच ठरू शकेल.
 
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात परिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व कौटुंबिक सदस्य मंडळींबरोबर असलेले मतभेद मिटतील. काही बाबतीत असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येवून मानसिक समाधान लाभेल. अंतिम चरणात आरोग्याचा किरकोळ समस्या व तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. इतरांचा सल्ला आपल्यासाठी विशेष लाभदायक स्वरूपाच सिद्ध होईल व मनावरील काळजीचे दडपण मिटेल.
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्व प्रकारच्या परीक्षेत मनोनुकूलरीत्या चांगले यश मिळेल. संततीबाबत असणारी गुप्तचिंता मिटण्याच्या दृष्टीक्षेपात राहतील. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येवू शकेल व शांतता टिकून राहील. अंतिम चरणात विरोधक मंडळींच्या कारवाया तुर्त काही काळ थांबतील. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होवू शकेल व मानसिक शांतता व समाधान लाभेल व काळजीचे सावट दूर होईल.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व अस्थिरता निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवीचे मार्गदर्शन घेणे आवश्यक व उचित ठरेल व होणारे नुकसान टळेल. अंतिम चरणात सहकारी अपेक्षेइतके सहकार्य करतील. क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात नवनवीन डावपेचाच प्रयोग करावा लागेल तसे काही प्रमाणात यश मिळण्याची दाट शक्यता आहे व यश समोर दिसू लागेल.
 
कन्या : मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण दूर होण्याच्या मार्गावर राहील. जवळचा प्रवासयोग जुळून येईल व प्रवास कार्यसाधक ठरेल व कोणत्याही बाबतीत अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. अंतिम चरणात आर्थिकस्थिती चढउतार स्वरूपातच राहू शकेल. आर्थिक गुंतवणूक करताना भावी काळात गुंतवणुकीवरील लाभाचा विचार करणे हितावहतेचे ठरेल.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आवश्यक स्वरूपाचे असणारे सहकार्य लाभेल व कोणतेही काम सहसा अपूर्ण व स्थगीत राहणार नाही. क्रीडा क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देईल व मानसिक आनंद व समाधान मिळेल. अंतिम चरणात कौटुंबिक आनंद वाढविणारे समाचार मिळतील. विशेष करून दूर निवासी प्रिय व्यक्तींचे मनोनुकूल व चांगले दूरध्वनी येतील. कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक स्थितीतच राहू शकेल.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्वत्र यश दृष्टीक्षेपात राहील व अपयशाचा सामना करावा लागणार नाही. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडेल व मानसिक आनंद वाढेल. अंतिम चरणात मनाविरुद्ध खर्चाच्या प्रंसगास सामोरे जावे लागेल. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यात असर्मथ स्थितीत राहतील. इतरांच्या सल्ला फक्त ऐकण्यापुरताच र्मयादित ठेवणे आवश्यक व उचितपणाचा ठरेल.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्वत्र दक्षता व काळजी घेणे आवश्यक व उचित ठरेल व भावी काळात होणारे नुकसान व मनस्ताप टळेल. कर्ज व्यवहार व महत्वपूर्ण करारावर अंतिम स्वाक्षरी करताना विशेष खबरदारी घेणे चांगले. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी राहील व समाधानकारकपणे स्थिती निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. काळजीचे सावट व दडपण कमी होवू शकेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत मिळतील व कार्य क्षेत्रात वरिष्ठांबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती हळूहळू पूर्व पदावर येईल व उद्योगक्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहू शकेल. अंतिम चरणात दूर निवासी प्रियव्यक्तीचे अचानक भेटीयोग येतील व मानसिक शांतता प्रस्थावित राहील. कार्य सभोतालीन परिस्थिती चांगली राहून नेत्रदीपक यशाचा मला खुलाच राहून अपेक्षित यश मिळेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पिडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक ठरू शकेल. योग्य ती काळजी घेणे आवश्यक व उचित ठरू शकेल. अंतिम चरणास शुभ धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची योग जुळून येतील. कलावंत व्यक्तीचा इतरांकडून यथा योग्य मान सन्मान सोहळा आयोजित केला जाईल व सर्वत्र अपेक्षेइतके यश मिळवून देणारी ग्रहस्थिती अनुकूल आहे.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. अल्पशा व सहजरित्या केलेल्या प्रयत्नास यश मिळेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके मदत कार्य करण्यासतत्पर राहतील व क्रीडा क्षेत्रातील वर्चस्व वाढेल. अंतिम चरणात नोकरीत अधिकारी वर्गांनी आपल्यावर सोपविलेली कामगिरी आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होण्याच्या मार्गावर राहील. मानसिक शांती टिकून राहून मानसिक दडपण कमी होवून उत्साह वाढेल.