गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:27 IST)

धनू राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊया

धनू कार्ड - Ten of Swords

या राशीच्या लोकांसाठी सुरुवातीस थोडा संघर्षाचा काळ असेल. नंतरचा काळ उत्कृष्ट फळ देणारा आहे. सकारात्मक राहा, संयमाने पुढे वाढा. छोट्या छोट्या गोष्टी मुळे अस्वस्थ होऊ नका. करियर मध्ये हळू हळू प्रगती होईल. व्यवसायदारांना लाभ होईल. कोणावर ही विश्वास ठेवू नका. स्वतःच्या योजना दुसऱ्यास सांगू नका. पुढे त्रास संभवतो. कौटुंबिक सहल होऊ शकते. आपणांस कुटुंब सहकार्य करेल. कामाच्या ताणाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. जोडीदाराशी संबंध उत्तम राहतील. प्रणयासाठी उत्तम वर्ष आहे. आर्थिक स्थिती सुधारेल.

करियर :- छोट्या छोट्या गोष्टींचा ताण असेल. आपल्या सहकर्मींना विश्वासात घेऊन काम करा. आपण उच्चपदासाठी प्रयत्न करू शकता. वर्ष सरता -सरता सगळं चांगलं होईल .
 
व्यवसाय :- आपण आपल्या व्यवसायच्या नफ्यासाठी नव्या लोकांशी संपर्कात याल. पण त्यांना आपल्या योजना सांगू नका. असे केल्यास आपल्याला व्यवसायेत लाभ होणार नाही. आपण आपल्या लक्ष प्राप्ती साठी वचनबद्ध आहात.
 
कुटुंब :- कौटुंबिक सहल होईल. कुटुंबात नवीन पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. वैवाहिक समारंभ होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. 
 
आरोग्य :- कामाचा ताण होईल. त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. सकारात्मक राहा. जोडीदाराची साथ आनंद देईल. पायाला दुखापत होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या.
 
प्रेम आणि वैवाहिक जीवन :- हे वर्ष आपल्या प्रेमासाठी चांगले आहे. आपला जोडीदार आपल्यावर खूश असेल. अविवाहितांना विवाह प्रस्ताव येतील. अविवाहितांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. 
 
आर्थिक स्थिती :- विचारपूर्वक गुंतवणूक करा. उत्पन्नाच्या व्यतिरिक्त स्रोताचा विचार कराल. उत्पन्न काळजीपूर्वक व्यवस्थापित करा. आपण उत्पन्नाच्या अतिरिक्त स्रोतांचा विचार करू शकता. आर्थिक स्थिती सुधारेल.
 
टिप :- धनागमनासाठी पाकिटात तीन फेंग शुई चिनीचे नाणे ठेवा.