मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 11 जानेवारी 2020 (15:18 IST)

तूळ राशीचे 2020 मधील टेरो कार्ड द्वारे भविष्य जाणून घेऊया

तूळ कार्ड - Seven of Cups
तूळ राशीसाठी वर्ष 2020 चढ-उताराचे असेल. कामाचा ताण असेल. नोकरी आणि पैशांची काळजी वाटेल. नव्या नोकरीच्या शोधात असल्यास नोकरी मिळेल. त्यामुळे आपली प्रगती होईल. या वर्षी आपल्याला अधिक श्रम करावे लागतील. पण परिणाम अपेक्षित मिळणार नाही. पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने आपणास यश नक्की मिळेल. कार्यक्षेत्रात आव्हाने मिळतील पण आपण यशस्वीरीत्या करून निघालं. अश्या परिस्थिती पण आपण आनंदी असाल. व्यवसाय संथ होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वर्ष सरत्या-सरत्या आपण चांगले कमवाल. आपल्याला कुटुंबीयांची साथ असेल. ते आपणांस यशस्वी होण्यासाठी प्रेरित करतील. त्वचेचे विकारांपासून त्रास संभवतो. उपचार घ्यावा लागेल. ह्या वर्षात नवीन आहार योजना सुरू करावी लागेल. 
आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. अविवाहितांना विवाहयोग येतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. किरकोळ वादविवाद होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. जास्त अपेक्षा करू नका.
 
करियर :- आपण नवीन कार्यस्थळी अस्वस्थ होऊ शकता. नव्या ठिकाणी काम आणि लोकांशी समरूप होण्यासाठी आपल्याला थोडा संघर्ष करावा लागेल. पण आपले सहकर्मी आपणांस प्रेरित आणि सहकार्य करतील. आपण कामावर प्रेम कराल. आणि त्यात आपले विचार आपणांस मदत करतील. 
 
व्यवसाय :- आपल्या मनाजोगती स्थिती नसेल .व्यवसाय सामान्य असेल. संपर्क वाढवल्याने नफा होईल. नव्या योजना आखाव्या लागतील. त्याचा फायदा होईल. व्यवसायात जोखीम घेणे फायदेशीर होईल.
 
कुटुंब :- कुटुंबातील सदस्यांची प्रवृत्ती आपल्यासाठी सकारात्मक आणि सहायक असेल. आपले कुटुंब आपणांस सहयोग करतील. त्यांचे पूर्ण समर्थन असतील. आपणांस आर्थिक मदत करतील.
 
आरोग्य :- यावर्षी आपल्याला खाण्या-पिण्याच्या सवयींवर लक्ष द्यावे लागतील. कुठल्या गोष्टीची ऍलर्जी होऊ शकते. आहाराचे योग्य नियोजन करा.
 
प्रेम आणि वैवाहिक जीवन :- विवाहितांसाठी हे वर्ष खूप चांगले राहील. जोडीदाराशी सुसंवाद होईल. एकमेकांच्या भावना जपाल. अविवाहितांसाठी पण चांगले वर्ष आहे. नवीन प्रस्ताव येतील.
 
आर्थिक स्थिती :- आपली आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे आपण आनंदी व्हाल. बचती कडे लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक गुंतवणुकीच्या योजना आखू शकता. कोणताही फायदा किंवा तोटा होणार नाही.
 
टिप :- मनी ताबीज जवळ ठेवा.
घरातील ईशान्य दिशेस तुळस ठेवा.
करियर मध्ये बढतीसाठी यांग अ‍ॅक्टिव्हिस्ट आणि टायगर्स आय घाला