बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2020
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:31 IST)

Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: तूळ

आर्थिक दृष्ट्या हे वर्ष आपल्यासाठी सामान्य राहील. जानेवारी ते एप्रिल आणि जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत आर्थिक परिस्थिती सुधारेल. धनार्जनाचे प्रयत्नांना यश मिळेल आणि एकापेक्षा अधिक स्रोतांकडून आपण उत्पन्न मिळवू शकाल. उर्वरित वेळ आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतो, म्हणून आपला खर्च नियंत्रित ठेवा आणि पैशांचा काळजीपूर्वक व्यवहार करा. 
 
आपल्याकडे कोणतेही थकीत कर्ज असल्यास, या वर्षी परतफेड होण्याची शक्यता जास्त आहे कारण वरील काळात निधीचा प्रवाह स्थिर राहू शकतो. घरातील शुभ कार्यास खर्च होतील. एप्रिल ते जुलै ह्या काळात आपण एखादी संपत्ती, घर, जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता.  
 
ह्या वर्षी आपण आपल्या आर्थिक व्यवस्थापनाबद्दल खूप जागरूक असाल, तरीही आपल्या खर्च आणि बचतीमध्ये अस्थिरतेची परिस्थिती असू शकते. ते अधिक चांगले करण्यासाठी आपण आधीपासूनच चांगली आर्थिक व्यवस्था तयार केली पाहिजे जेणेकरून प्रतिकूल काळात त्रास टाळता येईल. ह्या वर्षी आपण वर्षाच्या उत्तरार्धात दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता. नशिबाची उत्तम साथ मिळेल.