सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 2 डिसेंबर 2019 (10:41 IST)

अमिताभ यांच्याकडून ट्विटरवर उषा जाधवचे अभिनंदन

बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी मराठी अभिनेत्री उषा जाधवचं कौतुक केलं आहे. पणजी येथे पार पडलेल्या ‘इफ्फी’ आणि ‘न्यूयॉर्क साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये उषा जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 
 
ही बातमी उषाने तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केली. उषाच्या कामगिरीबद्दल बिग-बींच्या लक्षात येताच त्यांनीसुद्धा ट्विटरवर उषा जाधवचे अभिनंदन केले आहे. उषाचे अभिनंदन करताना बिग-बींनी ट्विट केलं की, ‘मला अभिमान आहे की मला तुमच्यासोबत ‘भूतनाथ रिटर्न्स’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. तसंच, तुमच्या आई-वडिलांसाठीही हा अभिमानाचा क्षण असेल.’