1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (12:24 IST)

अक्षय-करिनाने दिली भलतीच गुड न्यूज

Good news given by Akshay-Kareena
न्यूज ही अनेकांच्या चेहर्‍यावर आनंद आणि आयुष्यातही सकारात्कतेची उधळण करते. पण, खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार, करिना कपूर खान, दिलजित दोसांज आणि किआरा अडवाणी यांच्या जीवनात मात्र एक भलतीच गुड न्यूज आली आहे. ही अशी गुड न्यूज आहे, ज्यामुळे दोन जोडप्यांच्या जीवनावर त्याचे थेट परिणाम झाले आहेत. हे सारं खर्‍या आयुष्यात नव्हे, तर गुड न्यूज या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने सुरु आहे. 
एकसारखंच आडनाव असणार्‍या दोन जोडप्यांच्या जीवनात नव्या पाहुण्याच्या येण्याच्या निमित्ताने आयवीएफ सेंटरच्या चुकीमुळे जो घोळ घातला जातो, त्याची झलक या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. पंजाबी कलाविश्र्वात सुपरस्टार म्हणून नावलौकिक मिळवलेल्या अभिनेता दिलजित दोसांज आणि त्याच्यासोबत झळकणारी अभिनेत्री किआरा अडवाणी हिचा विनोदी अंदाज ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. तर, एका उच्चभ्रू जोडप्याच्या भूमिकेत   झळकणार्‍या करिना आणि अक्षय या दोघांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट 27 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये टिस्का चोप्रा, अंजना सुखानी आणि युक्ता मुखीसुद्धा झळकणार आहेत.