शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (12:01 IST)

त्या रात्री 'डिस्कोथेक'ला गेला आणि अभिनेता झाला

सुपर मॉडेल व अभिनेता अर्जुन रामपाल याचा वाढदिवस झाला. मॉडेलिंगपासून सुरुवात करणारा अर्जुन नंतर बॉलिवूडचा एक चर्चित चेहरा बनला. खरे तर अर्जुन अभिनयाच्या दुनियेत अपघातानेच आला, असे म्हणता येईल. होय, त्यादिवशी डिस्कोमध्ये गेला नसता तर अर्जुन कधीही अभिनेता झाला नसता. त्या एका रात्रीत जणू अर्जुनचे नशीब पालटले. 
 
मध्यप्रदेशातील जबलपूर येथे अर्जुनचा जन्म झाला. पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अर्जुन कामाच्या शोधात होता. एकदिवस अर्जुन आपल्या काही मित्रांसोबत डिस्कोमध्ये गेला. तो डिस्कोमध्ये बसला असताना सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर रोहित बल याची नजर त्याच्यावर पडली. अर्जुनचा अंदाज पाहून रोहितने त्याला फॅशन इंडस्ट्रीत येण्याची ऑफर दिली आणि यानंतर अर्जुनचा मॉडेलिंग क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. सुपरमॉडेल म्हणून तो ओळखला जाऊ लागला. पुढे अर्जुन बॉलिवूडमध्ये आला. अर्जुनचा पहिला सिनेमा 'मोक्ष' होता. पण 'प्यार इश्क और मोहब्बत' हा दुसरा सिनेमाप्रदर्शित झाल्यानंतर 'मोक्ष' रिलीज झाला. अर्जुनचे हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकले नाहीत. पण अर्जुनच्या अभिनयाचे यात कौतुक झाले. फार क्वचित लोकांना ठाऊक असावे की, अर्जुन रामपाल हा अभिनेत्री किम शर्माचा चुलत भाऊ आहे. अर्जुनने 1998 मध्ये सुपरमॉडेल मेहर जेसियासोबत लग्र केले. या दोघांना मायरा व महिका नावाच्या दोन मुली आहेत. पण नुकताच मेहर व अर्जुनचा कायदेशीर घटस्फोट झाला. सध्या अर्जुन गॅब्रिएला या मॉडेलला डेट करतोय. दोघांचे लग्र व्हायचे आहे. पण लग्राआधीच गॅब्रिएला अर्जुनच्या मुलाची आई झाली. अर्जुन तिसर्‍यांदा बाबा झाला.