Marathi Biodata Maker

साप्ताहिक राशीफल 13 ते 19 डिसेंबर 2020

Updated: शनिवार, 12 डिसेंबर 2020 (19:23 IST)
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक अस्थिर स्वरूपात राहील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवीचे मार्गदर्शन घेणे आवश्यक व उचित ठरेल. भावी काळात होणारे नुकसान काही प्रमाणात टळू शकेल. यश समोर दिसेल. अंतिम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी राहील. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहू शकतील व यश मिळेल.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. सर्वत्र अनुकूल व चांगल्या घडामोडी घडून येतील. यशाचा मार्ग खुलाच राहून यश मिळेल. अंतिम चरणात आर्थिक स्थिती कमजोर राहून इतरांनी दिलेले आर्थिक मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ राहतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वकच करणे अन्यथा भावी काळाचा दृष्टीने व्यवहार अडचणीचे ठरतील.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढेल. कर्ज व्यवहार प्रकरणे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावरच राहू शकतील. सर्व बाबतीत दगदग व त्रास वाढण्याची शक्यता आहे. शांतता ठेवणेच उचित ठरू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूलतेच्या स्थितीत राहील व मनाला दिलासा मिळेल. महत्त्वपूर्ण कामाच्या बाबतीत मनोनुकूल व चांगल्या घडामोडी घडून येतील. अपेक्षेप्रमाणे यश दृष्टिक्षेपात राहील.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात बहुतेक स्वरूपाच्या मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात येतील. अचानक धनलाभ योग संभवतो. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. धनलाभ होऊ शकतो. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे सावधानता ठेवूनच वाटचाल करणे उचित ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहणे नुकसानकारक ठरू शकेल.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत व अपेक्षित यश दृष्टिक्षेपात ठेवणारी ग्रहस्थिती आहे. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढीस लागू शकेल. अंतिम चरणात सहजरीत्या केलेले प्रयत्न यशस्वी होतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे चांगले दूरध्वनी येतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीतच राहतील.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रायोग घडेल व सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. अल्पशा प्रयत्नाने व सहजरीत्या केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. यश दृष्टिक्षेपात राहील. मनाप्रमाणे यश मिळून उत्साह वाढेल. अंतिम चरणात नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत व सूचना मिळतील. अधिकारी वर्गाची मर्जी राहून त्यांनी सोपविलेली कामगिरी आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहील.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचे ठरू शकेल. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहू नये. अंतिम चरणात शुभ कार्यानिमित्त प्रवास योग जुळून येईल. महत्त्वपूर्ण कामाबाबत अनुकूल व चांगले वार्तापत्र येईल. मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून चांगल्या प्रकारे लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहू शकेल. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास तो जरूर स्वीकारावा. अंतिम चरणात विविध प्रकारच्या अडचणी व समस्या वाढतील. काही बाबतीत परिश्रम करूनही तितकेसे यश मिळणे अवघड स्थितीत राहील. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकणेच उचित ठरेल. .
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्य चांगले राहील व आरोग्याच्या सर्व समस्या मिटण्याच्या मार्गावर राहतील. काही बाबतीत विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. अंतिम चरणात कार्यक्षेत्रात आपला प्रभाव व वर्चस्व वाढेल. वस्तुस्थितीचा आढावा घेऊन घेतलेला निर्णय भावी काळाच्या दृष्टीने लाभाचाच ठरेल. भागीदारीत असणारा वाद मिटेल व भागादीरामधून विशेष प्रकारे फायदा घडून येईल.

सर्व पहा

Jyeshtha Gauri 2026 ज्येष्ठा गौरी आवाहन; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि या तीन दिवसांमागची कथा

मोदक पायसम खीर: पारंपरिक आणि चवदार दक्षिण भारतीय फ्युजन रेसिपी Modak Payasam Kheer

अनंत चतुर्दशी २०२६ कधी आहे? या दिवशी अनंत सूत्र बांधण्याची परंपरा आहे, या १४ गाठी कशाचे प्रतीक?

Santan Saptami 2026 १८ सप्टेंबर रोजी संतान सप्तमी, पूजा पद्धत, नियम आणि व्रताची कथा

दुकानातील मिठाई आणणे टाळा! घरीच बेसन वापरून १० मिनिटात मोतीचूर लाडू बनवा

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments