Daily Horoscope

सुंदर त्वचेसाठी लावा हे स्ट्रॉबेरी मास्क

Updated: गुरूवार, 22 जानेवारी 2026 (08:21 IST)
ALSO READ: सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या
मध आणि स्ट्रॉबेरी फेस मास्क-
त्वचा चांगली बनवायची असल्यास हा पॅक बनवा. या साठी स्ट्रॉबेरी घ्या आणि त्यांना मॅश करून पेस्ट बनवा. त्यात एक चमचा मध घालून मिसळून हा पॅक मास्कवर लावा 15 मिनिट तसेच ठेऊन पाण्याने चेहरा धुवून घ्या. 
 
स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट फेस मास्क-
नितळ आणि स्वच्छ त्वचा मिळवायची असेल तर हा पॅक लावा. हे बनविण्यासाठी सर्वप्रथम स्ट्रॉबेरी मॅश करून त्यात एक चमचा कोको पावडर घालून चांगले मिसळून घ्या.  15 मिनिट हा पॅक लावून तसेच राहू द्या . नंतर पाण्याने चेहरा धुवून घ्या. 
ALSO READ: डेड स्किन काढण्यासाठी हा स्क्रब फायदेशीर आहे
स्ट्रॉबेरी आणि क्रीम फेस मास्क- 
हा फेसपॅक त्वचेला अधिक मॉइस्चराइझ  करतो. विशेषतः हिवाळ्यात हा पॅक खूप फायदेशीर आहे. यासाठी स्ट्रॉबेरी मॅश करून त्याची पेस्ट बनवा. आता थोडे मध आणि मलई घालून मिक्स करा.  चेहरा स्वच्छ करा आणि हा मास्क  चेहऱ्यावर लावा. सुमारे 10-12 मिनिटांनंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.
ALSO READ: हिवाळ्यात तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी फक्त दोन गोष्टी वापरा
स्ट्रॉबेरी आणि तांदळाच्या पिठाचा फेस मास्क- 
मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून त्वचा अधिक सुंदर बनवायची असेल तर हा फेस स्क्रब बनवा. यासाठी स्ट्रॉबेरीचे मिश्रण करून पेस्ट बनवा. आता त्यात दही, व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. आता चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी त्वचा स्क्रब करा. साधारण 5 मिनिटे असेच राहू द्या. पाण्याने धुवून घ्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited  by - Priya Dixit 
 
 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments