Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेयोनेझ फक्त ब्रेडवर नव्हे तर चेहर्‍यावर देखील लावावे, दिवाळीत मिळेल चमकणारी त्वचा

Updated: मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018 (12:48 IST)
 
आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकच आहे आणि ते आहे घरगुती उपचार. आपल्या केस आणि त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येवर आपल्याला घरगुती उपचार मिळतील आणि त्या समस्या सोडवत्या देखील येतील. तसेच, हे उपचार सुरक्षित आणि स्वस्त आहे. चेहर्‍यावर चमक आणण्यासाठी वापरण्यात येणार्‍या घरगुती उपायांपैकी एक मेयोनेझ आहे. याची चव बर्‍याच लोकांना आवडते, त्याच बरोबर मेयोनेझ केस आणि चेहर्‍यासाठी फार फायदेशीर आहे. मेयोनेझमुळे तुमच्या त्वचेचे टोन एकरूप आणि मॉइस्चराइज करते. हे त्वचेची मृत कोशिकांना काढून त्वचेला मऊ आणि स्वच्छ बनवतो.
 
मेयोनेझचे फक्त हेच फायदे नाही आहे. हे चेहऱ्यावरील  सुकुरत्या कमी करून वृद्धत्वाची लक्षणे कमी करतो. मेयोनेझच्या अशा फायद्यांविषयी जाणून घेतल्यास आपण स्वत: हे समजू शकाल की जेव्हा त्वचेची काळजी घ्यायची असेल तेव्हा हे एक चांगले पर्याय आहे. आपण आपल्या त्वचेच्या काळजीसाठी नेमाने मेयोनेझचे फेस पॅक किंवा मसाज क्रीम म्हणून याचा वापर करू शकता. त्वचा टोन ऐकरूप करण्यासाठी आपण मेयोनेझ मास्क लावून कशा प्रकारे याचा उपयोग करू शकतो हे जाणून घेऊ.   
त्वचा टोन हलकी करण्यासाठी मेयोनेझ कसे वापरावे?
 
* सामग्रीः 
2 चमचे मेयोनेझ
1 चमचे मध
1 चमचे पिठी साखर
1 चमचे पाउडर ओटमील
1 चमचा लिंबाचा रस
 
प्रयोग कसा करावा?
 
* एक वाडगा घ्या, त्यात मेयोनेझ आणि मध एकत्र एकत्र करून मिक्स करा.
* या मिश्रणात पिठी साखर घाला.  
* आता ओटमील पावडर घाला आणि सर्व सामग्री चांगल्याप्रकारे मिसळा.
* नंतर त्यात लिंबाचा रस घाला आणि चांगल्याप्रकारे त्याची पेस्ट तयार करा.
* आता आपले तोंड स्वच्छ पाण्याने धुवा आणि टिशू पेपरच्या सहाय्याने ते कोरडे पुसून घ्या.
* ब्रशच्या मदतीने आपल्या चेहर्‍यावर मेयोनेझचे क्रीमयुक्त पेस्ट लावा.   
* आपण हे मिश्रण आपल्या मानेवर देखील लावावे जेणेकरून चेहरा आणि मानेच्या त्वचेचा टोन समान असेल. हा पेस्ट 20 मिनिटे ठेवा.
* कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. स्वच्छ टॉवेलचा वापर करा.   
 
जर आपल्याला चांगले परिणाम हवे असतील तर आठवड्यातून एकदा या कृतीचा वापर करा.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Rakhi Marathi Wishes 2026 रक्षाबंधन शुभेच्छा संदेश

रक्षाबंधन खास प्रसंगी भावासाठी बनवा पारंपरिक आणि पौष्टिक ''मूग डाळ बर्फी''

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुकांचे पाणी प्या; आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

BPharma 12 वी नंतर बॅचलर ऑफ फार्मसीमध्ये मध्ये करिअर बनवा, पात्रता, पगार व्याप्ती जाणून घ्या

महागड्या केमिकल हेअर कलर्सना निरोप द्या, हा घरगुती हेअर डाय घरीच बनवा

पुढील लेख
Show comments