शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हिरे व्यापारी ढोलकिया देणार ६०० गाड्या, ९०० कर्मचाऱ्याना फडी

दिवाळीच्या निमित्तानं आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून नवीन कोऱ्या कार भेट देणारे हिऱ्यांचे व्यापारी सावजी ढोलकिया पुन्हा एकदा चर्चेत आहेत.  हरि कृष्णा एक्सपोर्ट्सचे चेअरमन असलेले ढोलकिया या दिवाळीला त्यांच्या 600 कर्मचाऱ्यांना कार भेट देणार तर  आहेतच सोबत  900 कर्मचाऱ्यांना एफडीदेखील देणार आहे. येत्या गुरुवारी डायमंड किंग सावजी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट देणार आहेत.  पहिल्यांदाच या समूहातील चार कर्मचाऱ्यांचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. 
 
सावजी ढोलकिया यांनीमाहिती देताना सांगितले की  लॉयल्टी कार्यक्रमाच्या अंतर्गत या वर्षी दीड हजार कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. सोबतच 600 जणांनी गिफ्टमध्ये कार स्वीकारण्यास सहमती दिली आहे.  900 कर्मचाऱ्यांनी एफडीला पसंती दिली आहे. पहिल्यांदाच आमच्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते दिवाळी गिफ्ट मिळणार आहे. आमच्या चार कर्मचाऱ्यांचा सन्मान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये एका दिव्यांग मुलीचादेखील समावेश आहे, असं ढोलकिया अस स्पष्ट केले आहे.