1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 7 जुलै 2025 (15:14 IST)

पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबनेचा प्रयत्नात असलेल्या आरोपीला अटक

arrest
महापुरुषांच्या पुतळ्यांसोबत याआधीही अनेक विडंबनात्मक घटना घडल्या आहेत. काही समाजकंटक अशा घटना घडवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुण्यातील रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव सुरज शुक्ला असून त्याने हातात कोयता घेऊन पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला.या घटनेनंतर, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुतळ्याला दुग्धअभिषेक करून निषेध व्यक्त केला. पुतळा तोडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सुरज शुक्लाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोलीस त्याची चौकशी करत आहे. 
 
रविवारी  पुणे स्टेशन समोरील असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न भगवे वस्त्र घातलेल्या  सुरज शुक्ला नावाच्या तरुणाने केला आरोपी कवत घेऊन पुतळ्याच्या पायथ्याशी चढला. काही लोकांनी त्याला पकडून खाली खेचल्याने त्याचा प्रयत्न फिसकटला.
या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली. पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला पोलिस ठाण्यात नेले. पोलिस अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.
 
या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.तसेच यावेळी अरविंद शिंदे यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक घातला.
यातून समाजात केवळ तेढ निर्माण करणे हाच उद्देश आहे. पण हा उद्देश देशातील जनता कधीही पूर्ण होऊ देणार नाही. पुणे स्टेशन नामांतराची चर्चा थांबत नाही तोवर काल रात्री भगवे वस्त्र परिधान करून सुरज शुक्ला या तरुणाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली.आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी अरविंद शिंदे यांनी केली आहे. 
Edited By - Priya Dixit