गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (13:34 IST)

दिवाळीत चुकून सुद्धा कोणालाही या भेटवस्तू देऊ नका

दिवाळीच्या आगमनाच्या काही दिवस आधी लोक त्यांच्या घराच्या स्वच्छतेकडे खास लक्ष देतात आणि मग सणाच्या दिवशी इतर सजावट वस्तूंनी घरे सजवतात. या दिवशी संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याच वेळी लोक एकमेकांच्या घरी भेट देतात आणि उत्सव साजरा करतात. लोक दिवाळीत एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू देतात. बऱ्याचं वेळा आपण नकळत आपल्या मित्रांना आणि नातेवाइकानं काही भेटवस्तू देतो जे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर आपल्यासाठी देखील योग्य नसते. आम्ही तुम्हाला अशा काही भेटवस्तूबद्दल सांगू ज्या तुम्ही दिवाळीवर चुकूनही तुमच्या प्रिय व्यक्तींना देऊ नका. चला जाणून घेऊ या त्या गोष्टी काय आहे?
 
या दिवाळी चुकून सुद्धा कोणालाही या भेटवस्तू देऊ नका.
दिवाळी उत्सव लक्ष्मीशी संबंधित असल्याने, ज्योतिषानुसार, या भेटवस्तू देण्यास किंवा घेण्यास लक्ष्मीची कृपा आमच्यावर होत नाही.
* दिवाळीच्या आधी धनतेरसची पूजा देखील फार महत्त्वाची आहे. या दिवशी आपण कोणालाही भेट देत असल्यास लक्षात ठेवा की हे आयटम ओकातला मेटलचे बनलेले नसावे.
* लक्ष्मी आणि गणेश यांची प्रतिमा किंवा फोटो हे भेटवस्तू देऊ नये. यामुळे आपली समृद्धी दुसऱ्यांना दिली जाते असे मानले जाते. 
* आपण भेटवस्तू म्हणून भांडी देऊ शकता, पण त्यात पाण्याचे ग्लास आणि जग नसावे.
* सोने आणि चांदीची भांडी देऊ नका.