testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लक्ष्मीचा जन्म कसा झाला

laxmi
Last Updated: बुधवार, 16 ऑक्टोबर 2019 (12:00 IST)
देवांनी राक्षसांच्या मदतीने अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केले. बरीच वर्षे चाललेल्या या मंथनातून सर्वप्रथम विष प्रकट झाले. या विषाच्या ज्वाला एवढ्या तीव्र होत्या की त्यामुळे तिन्ही लोकांत हाहाकार माजला. तेव्हा शंकराने त्या ज्वाला आपल्या कंठात धारण केल्या. मंथनात चौदा रत्ने प्राप्त झाली. त्यामध्ये श्री रंभा, विष, वरूण, अमृत, शंख, धेनू, गजराज, धनू, कल्पद्रुम, धन्वंतरी, शशी, बाज आणि मणी त्यापैकी एका रत्नाच्या रूपात लक्ष्मीचा जन्म झाला.
या विविध रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतले. भगवान विष्णूने लक्ष्मीचा आपल्या अर्धांगिनीच्या रूपात स्वीकारले. तेव्हापासून लक्ष्मीला विष्णूप्रिया, विष्णू पत्नी किंवा विष्णू वल्लभा असे म्हटले जाऊ लागले. समुद्रमंथनापासून उत्पन्न झाल्यामुळे सिंधुसुता हेही एक नाव तिला देण्यात आहे. लक्ष्मीचा रंग गोरा आणि चार भुजा आहेत. तिने किरीट मुकूट आणि दिव्य वस्त्रालंकार धारण केले आहेत. लोक तिला ऐश्वर्य आणि समृद्धीची अधिष्ठात्री मानतात. घुबड हे तिच्या वाहनाच्या रूपात आहे. ती स्वभावाने अतिशय चंचल आहे.

कमल थिर न रहीम कही यही जानत सब कोय।
पुरूष पुरातन की वधु क्यूं न चंचला होय।।

लक्ष्मी कधीच एका जागेवर स्थिर राहत नाही. परंतु, ती विष्णू पत्नी असल्यामुळे विष्णूच्या आराधनेबरोबर तिचीही नियमीतपणे आराधना केली जाते. तिथे ती स्थिर रूपात निवास करते. तिचे आसन कमळ असल्यामुळे तिला कमला किंवा कमलासना असेही म्हटले जाते. कार्तिक कृष्णा अमावस्येला दीपावलीच्या रात्री महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मी विशेष रूपात विश्वभ्रमणासाठी निघते. महालक्ष्मीची उपासना केल्यामुळे दु:ख, दारिद्रयापासून मुक्ती मिळून ऐश्वर्य प्राप्त होते.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

धनत्रयोदशी 2019 : यमराजाचा आशीर्वाद मिळेल या 3 सोप्या ...

धनत्रयोदशी 2019 : यमराजाचा आशीर्वाद मिळेल या 3 सोप्या उपायांनी
धनत्रयोदशीला सर्वात आधी घराच्या प्रमुख दारावर कोणतेही धान्याचे (गहू किंवा तांदूळ) ढिगारा ...

Diwali 2019 प्रत्येक दिवसासाठी एक खास उपाय

Diwali 2019 प्रत्येक दिवसासाठी एक खास उपाय
दिवाळीचे 5 दिवस धन संकट दूर करण्यासाठी सर्वात उत्तम मानले गेले आहे. शास्त्रानुसार या ...

धार्मिक, वास्तू, वैज्ञानिक आणि फेंगशुईनुसार बांबू जाळणे ...

धार्मिक, वास्तू, वैज्ञानिक आणि फेंगशुईनुसार बांबू जाळणे अशुभ का आहे ते जाणून घ्या
शास्त्रानुसार बांबूच्या लाकडाला जाळण्यास मनाई आहे. बांबू कोणत्याही हवन किंवा पूजामध्ये ...

दिवाळी का साजरी केली जाते

दिवाळी का साजरी केली जाते
दिव्यांचा सण दिवाळी का साजरी केली जाते यामागे वेगवेगळ्या कहाण्या आणि परंपरा आहेत. म्हणतात ...

दिवाळीच्या काळी रात्री या प्रकारे करा काली पूजा, चमत्कार ...

दिवाळीच्या काळी रात्री या प्रकारे करा काली पूजा, चमत्कार घडेल
दिवाळीच्या 5 दिवसीय उत्सवात देवी कालीची दोनदा पूजा होते. एक नरक चतुर्दशीच्या दिवशी ज्याला ...

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...