बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 25 मे 2023 (20:51 IST)

त्वचा उजळवण्यासाठी हे करा...

सध्याच्या प्रदूषित वातावरणात सुंदर त्वचा मिळवणं ही सोपी गोष्ट राहिलेली नाही. यासठी त्वचेची सफाई, टोनिंग, मॉयश्चरायजिंग, नरिशंग आणि पर्मिंग या गोष्टी महत्वाचा ठरतात. वाफ घेऊन त्वचेच्या छिद्रात अडकलेले धूळ, घाण यांचे कण काढून टाकता येतात. टोनिंग अत्यंत महत्वाचं ठरतं.
 
तेलकट त्वचेसाठी ऑस्ट्रिंजंट लावलं पाहिजे. कोरड्या त्वचेसाठी काकडीचा रस लावून चेहरा थंड पाण्याने धुतला पाहिजे. हल्ली ब्युटी पार्लरमध्येही तेलकट त्वचेसाठी उकळत्या पाण्यात पुदिन्याची पानं टाकून 20 मिनिटं ठेवलेल्या पाण्यात टोनिंग केलं जातं.
 
मैदा आणि टॉल्कम पावडर पाण्यात मिसळून त्वचेवर हा पॅक लावल्यास त्वचेला पोषण मिळतं. ग्रीन टीला उकळून गार केलेल्या पाण्यात मध मिसळून चेहर्‍यावर हा पॅक लावला तरी चेहर्‍याला आवश्यक पोषण मिळंतं. याखेरीज ब्युटी पार्लरमध्ये नॅचरल फेशियलला सध्या महत्व आलं आहे. यांमध्ये विविध फळांच्या गरांपासून तयार केलेली उत्पादनं वापरी जातात. ही उत्पादनं सुगंधी असतात आणि त्वचेला नैसर्गिक पोषकद्रव्यं मिळवून देतात.