Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hair केसांमुळेही कळतो स्वभाव

Updated: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (19:36 IST)
 
केसांमध्ये वापरण्यात येणार्‍या अँक्सेसरीजमधूनही स्वभावाची पारख करता येते. केसांमध्ये चित्रविचित्र, ठसठशीत हेअर अँक्सेसरीज घालणं आवडणार्‍या तरूणी गर्दीपासून निराळ्या राहणार्‍या किंवा फटकून वागणार्‍या असतात. त्यांचे वागणे चारचौघींप्रमाणे नसते. अशा अँक्सेसरीज घालून रॅम्पवर अवतरणार्‍या मॉडेल आपल्यातल्या वाटत नाहीत ते याचमुळे. 
 
कपाळाच्या वर फार चकमक नसणारा, साधासा, निटेड, पिंट्रेड हेअरबेल्ट वापरल्याने व्यक्तिमत्त्वाला कोझीनेस प्राप्त होतो. अशा प्रकारे केस बांधणार्‍या मुली आतल्या गाठीच्या वाटत नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक प्रकारचा उबदारपणा प्राप्त होतो.
 
 काही जणींना केसांमधल्या एखाद्या बटेला लपेटण्याची हौस असते. अशांना थोडी हटके हुशारी असणारं आर्टिस्टिक समजलं जातं. शिवाय अशा मुली ट्रेण्डी असतात. अशा प्रकारचे केस मादक आणि फेमिनाईन समजले जातात. चारजणींमध्ये लक्ष वेधून घेणारा हा केशसंभार परफेक्ट समजला जातो.
 
 लांबसडक केस मोकळे सोडणं आवडणार्‍या स्त्रिया मोकळ्या, फुलपाखरी वृत्ती असणार्‍या समजल्या जातात. मध्यम लांबीच्या मोकळ्या केसातून तुमचं ईव्हन टेम्पर झळकतं, आत्मविश्वास दिसतो. अशा प्रकारचे केस असणार्‍या स्पष्टवक्त्या असतात. मध्यम लांबीचे किंवा लांब, मोकळे, वार्‍यावर उडणारे, थोडे अस्ताव्यस्त केस आय डोण्ट केअर वृत्ती दर्शवतात. अशा स्त्रिया बिनधास्त आणि जगाची पर्वा न करणार्‍या असतात. बॉयकटपासून डायनाकटपर्यंत सगळे छोटय़ा कटचे प्रकार 
 
व्यक्तिमत्त्वातली शिष्टपणाची बाजू समोर आणतात. त्यातून समोरच्याला हातभर दूर राहाण्याचा संकेत दिला जातो. भांग पाडून वेणी घालणं हा गर्लिश लूक आहे आणि तो क्यूट, इनोसंट समजला जातो.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Colorful Coconut Rolls रक्षाबंधनाला बाजारातून आणण्यापेक्षा घरीच बनवा 'रंगीबेरंगी मिठाई'

Raksha Bandhan 2026 Wishes for Sister in Marathi बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Wishes for Brother in Marathi 2026 भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

मधुमेह असताना लोणचे, पापड आणि चटणी खाणे योग्य का?

हॉटेल इंडस्ट्रीत करिअर करायचे आहे? फूड प्रोडक्शन कोर्स ठरेल फायदेशीर!

पुढील लेख
Show comments