गुरूवार, 30 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (16:14 IST)

मुकेश अंबानी आजोबा झाले, ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला

mukesh ambani
देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानी हिने 19 नोव्हेंबर रोजी जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. ईशाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला आहे. मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्ण ठेवले आहे. अंबानी कुटुंबात मिळालेली ही आनंदाची बातमी अंबानी कुटुंबाने मीडिया स्टेटमेंट जारी करून शेअर केली आहे. अंबानी कुटुंबात ही मोठी बातमी आली आहे. 
 
ईशा अंबानी सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधील रिलायन्स रिटेलचा व्यवसाय पाहते. ईशा ही अंबानी कुटुंबातील एकुलती एक मुलगी आहे. वयाच्या 23 व्या वर्षी तिने रिलायन्समध्ये व्यवसाय हाताळण्यास सुरुवात केली. रिलायन्स रिटेलशिवाय ती रिलायन्स जिओमध्येही महत्त्वाची भूमिका बजावते. 
 
 ईशा अंबानीने चार वर्षांपूर्वी बिझनेस मॅन आनंद पिरामलसोबत लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघेही आई-वडील झाले आहेत. आनंद हा व्यवसायाने व्यापारी आहे. आनंद पिरामल यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी मिळवली. सध्या आनंद हे पिरामल ग्रुपचे कार्यकारी संचालक आहेत. 
 
 आनंद हे मूळचे  राजस्थानचे  आहे. आनंद हे अजय पिरामल आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आहे, जे पिरामल एंटरप्रायझेसचे मालक आहेत.आनंदची आई स्वाती या व्यवसायाने शास्त्रज्ञ आणि उद्योगपती आहेत. आनंदची आई स्वाती यांनाही 2012 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. 

Edited By - Priya Dixit