suvichar
✕

आता ‘यूआयडीएआय’ने व्हर्च्यूअल आयडी सुरू होणार

Updated: गुरूवार, 11 जानेवारी 2018 (09:42 IST)

येत्या मार्च महिन्यापासून व्हर्च्यूअल आयडीची सुरुवात केली जाईल. मात्र, जूनपासून अनिवार्य केले जाईल. ज्या यंत्रणा या व्हर्च्यूअल आयडीच्याद‍ृष्टीने सुविधांमध्ये बदल करणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. सध्या जे आधारकार्ड आहे, त्यात एकूण 12 अंक असतात. मात्र, व्हर्च्यूअल कार्डमध्ये 16 अंक असतील. 

सिमकार्ड व्हेरिफिकेशनसह विविध योजनांसाठी या व्हर्च्यूअल आयडीचा वापर करू शकतील. आधारकार्डधारकांना वेबसाईटवरून हा आयडी तयार करता येईल. हा क्रमांक तात्पुरता असेल. नव्याने व्हर्च्यूअल आयडी काढता येणार आहे. हा क्रमांक बदलताही येईल. त्यामुळे आधारक्रमांक द्यावा लागणार नाही.

कुणीही नागरिक ‘यूआयडीएआय’च्या वेबसाईटवर (https://uidai.gov.in) जाऊन आधीच्याच आधारकार्डच्या माहितीवरून व्हर्च्यूअल आयडी बनवू शकतो. 16 अंकांचा हा व्हर्च्यूअल आयडी ठराविक वेळेपुरता मर्यादित असेल. त्यामुळे मुदतीनंतर पुन्हा नवीन व्हर्च्यूअल आयडी बनवावा लागेल. व्हर्च्यूअल आयडीतून बँक किंवा फोन कंपन्यांना नागरिकांची केवळ मर्यादित माहिती (नाव, पत्ता, फोटो) मिळेल. एवढीच माहिती त्यांना गरजेची असते. व्हर्च्यूअल आयडीही ओळखपत्र म्हणून वापरले जाऊ शकते. केवायसी करायचे असेल, तिथेही व्हर्च्यूअल आयडी स्वीकारला जाईल.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

LIVE: नाशिक सिंहस्थ कुंभादरम्यान दररोज १५० हून अधिक विशेष गाड्या धावणार

शरद पवार साहेबांनी डिलिमिटेशन विधेयकाला विरोध केला, तर मी जाहीरपणे त्यांची माफी मागेन....विजय वडेट्टीवार यांची भूमिका बदलली

भाजप खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांची वरिष्ठ सभागृहाच्या उपाध्यक्षपदाच्या पॅनेलवर नियुक्ती

महाराष्ट्राला नशामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी मोहीम सुरू केली

नाशिक सिंहस्थ कुंभादरम्यान दररोज १५० हून अधिक विशेष गाड्या धावणार

पुढील लेख
Show comments