सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 7 जुलै 2018 (09:47 IST)

बँक ऑफ चायनाची पहिली शाखा मुंबईत

भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक ऑफ चायनाने मागितलेल्या परवान्याला रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली आहे. या बँकेची पहिली शाखा मुंबईमध्ये सुरू होणार आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेवेळी मोदींनी बँक ऑफ चायनाला भारतात व्यवसाय परवाना दिला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार परवानगीसंदर्भातला सिक्युरिटी क्लिअरन्स अर्ज २०१६ मध्ये करण्यात आला होता.
 
या परवानगीमुळे बँक ऑफ चायना भारतात व्यवसाय करणारी दुसरी चिनी बँक ठरणार आहे. चायनाची सरकारी बँक हाँगकाँग ऍण्ड शांघाय स्टॉक एक्स्चेंजवर अगोदरच लिस्ट झाली आहे. बँक ऑफ चायनानंतर भारतात व्यवसाय करणाऱ्या विदेशी बँकांची संख्या ४६ वर गेली आहे. युकेची स्टॅण्डर्ड चार्टर्ड ही भारतातील सर्वाधिक १०० शाखा असलेली विदेशी बँक आहे.