Festival Posters
✕

जीएसटीमध्ये मोठी तूट

Updated: शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (09:46 IST)
 
यंदा राज्याला एक एप्रिल ते २७ ऑगस्टपर्यंत ३२ हजार ७०२ कोटी रूपये महसूल मिळाला आहे. त्यात पेट्रोल व डिझेल १० हजार ५४३ कोटी (व्हॅटमधून), व्यवसाय कर ७६८ कोटी, एसजीएसटी १५ हजार ९२५ कोटी, आयजीएसटी ५ हजार ४६५ कोटी यांचा जीएसटीत समावेश आहे. २०१५-१६ मध्ये राज्यातील जकात बंद केल्यानंतर तितकेच उत्पन्न जीएसटीतून मिळण्याची हमी केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे. अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास पाच वर्ष दरवर्षी १४ टक्के वाढ नुकसान भरपाईत देण्याची हमी देण्यात आली आहे.
 
केंद्र सरकारच्या या हमीनुसार राज्याची यावर्षीची २२ हजार ५०० कोटीची जीएसटीची नुकसान भरपाई प्रलंबित आहे. मागच्या वर्षीची ६ हजार ८३६ कोटी थकबाकी यावर्षी मिळाली आहे. २०१५-२०१६ मध्ये पेट्रोल डिझेलवरील व्हॅट वगळता राज्याला ६० हजार कोटी जीएसटीतून मिळाले. त्यावर १४ टक्के वाढीप्रमाणे मागील पाच वर्षांतील म्हणजे पुढील वर्षापर्यंत एक लाख १६ हजार कोटींवर ही थकबाकी जाणार आहे, अशी माहिती जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

भारतात Lava Aura Curve लाँच: मिनी रियर डिस्प्ले आणि ६,००० mAh बॅटरी; जाणून घ्या किंमत

कोल्हापुरातून परतताना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातात चार मित्रांचा दुर्देवी मृत्यू

जळगावमध्ये दसऱ्याच्या रात्री क्षुल्लक कारणावरून कोयत्याने हल्ला; ४० वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

सातारा जिल्ह्यातील मार्डी गावात एका वृद्ध दाम्पत्यावर धारदार शस्त्राने हल्ला

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये वडील आणि मुलासह तिघांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments