Marathi Biodata Maker
✕

एमजी मोटरद्वारे भारतातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण

Updated: मंगळवार, 2 एप्रिल 2019 (16:29 IST)
 
मायक्रोसॉफ्ट, अॅडोब, अनलिमिट,एसएपी, सिस्को, गाना, टॉम टॉम आणि न्यूआन्स यांसह इतर वैश्विक टेक भागीदारांच्या सशक्त संघटनेसह या कार निर्मात्या कंपनीने इंटरनेट-सक्षम कारची अनेक नवीन वैशिष्ट्ये प्रस्तुत केली, जी एमजी हेक्टरमध्ये उपलब्ध असतील.
 
एमजी हेक्टरचे सर्वात अद्भुत असे फीचर म्हणजे व्हॉईस असिस्ट. हे एक दमदार व्हॉईस अॅप्लिकेशन आहे, जे क्लाउड आणि हेड युनिटवर चालते. न्यूआन्सने ते एमजी इंडियासाठी विकसित केलेले असून ते विशेष करून भारतासाठी भारतीय उच्चारांनुसार बनवले आहे. यातील बिल्ट-इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम्समुळे वापर वाढत जाईल तसतशी ही प्रणाली शिकत जाईल आणि अधिकाधिक चांगली होईल. हे व्हॉईस असिस्ट ‘हॅलो एमजी” म्हटल्याने सक्रिय होते व १०० कमांड्स जाणते, ज्यात खिडक्या आणि सन-रूफ उघडणे किंवा बंद करणे, एसी नियंत्रण, नेव्हिगेशन, इ.चा समावेश आहे. तसेच, ते कनेक्टिव्हिटी क्षीण असली तरी काम करते.
 
आयस्मार्ट नेक्स्ट जेन हे आयस्मार्ट मोबाइल अॅपद्वारा समर्थित आहे. एमजी आयस्मार्ट अॅप मध्ये अशी अनेक फीचर्स आहेत, जी भारतीय बाजारात अजून आलेली नाहीत. प्रत्येक वेळी अॅप सुरू केल्यानंतर कार स्कॅन केली जाते आणि कारचे लोकेशन, टायरमधील प्रेशर किंवा दार लॉक झालेले आहे की नाही अशा प्रकारची माहिती त्यात आहे.मालक दरवाजे थेट लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी, इग्निशन सुरू करण्यासाठी आणि एअर कंडिशनर सुरू करण्यासाठी रिमोट अॅप वापरू शकतात. भारतातील तीव्र हवामान परिस्थितीत हे खूप उपयोगी आहे. हे मालकाला सर्व्हिसचे वेळापत्रक बनवायला देखील मदत करते आणि सर्व्हिस केल्याचा माग देखील ठेवते.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री राजीव छाबा म्हणाले, “इंटरनेट आणि कार्सच्या एकत्रीकरणामुळे नव्या फीचर्सचा मार्ग खुला होईल व त्यामुळे भारतातील एमजीच्या ग्राहकांना एक निर्विघ्न आणि अपडेटेड स्वामित्वाचा अनुभव मिळेल. एम्बेडेड सिमकार्ड आणि ओटीएसह एमजी हेक्टर हळूहळू अनेक नवीन गोष्टी करेल, आपल्या क्षमता सतत विस्तारित जो सतत निर्विघ्न ड्रायव्हिंगचा अनुभव देईल. शिवाय भारतात ५जी कनेक्टिव्हिटीच्या आगमनाने एमजी कार्स नवीन, अभूतपूर्व फीचर्स दाखल करण्यास सक्षम होईल व त्यामुळे कार ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी सुधारेल.”

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments