मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नाशिक , गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (07:48 IST)

कांद्याचा पुन्हा वांदा, व्यापा-यांचा बेमुदत संप

onion
नाशिकमध्ये कांदा प्रश्न पुन्हा पेटला असून कांदा उत्पादक शेतक-यांनंतर आता कांदा व्यापारी वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे. कांदा व्यापा-यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आजपासून कांदा व्यापा-यांनी बेमुदत बंदची हाक दिली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
 
नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांत सातत्याने कांदा उत्पादक शेतक-यांची अनेक आंदोलने पाहायला मिळाली. सुरुवातीला केंद्राने निर्यात शुल्क वाढविल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. त्यानंतर केंद्राने नाफेडकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही शेतक-यांमध्ये नाराजी होती. अनेक दिवस हे आंदोलन सुरू होते. आता कुठे कांदा लिलाव सुरू झाला होता, तोच आता कांदा व्यापा-यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तोडगा निघू न शकल्याने आजपासून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला. ही बैठक जिल्हाधिका-यांसोबत झाली. यावेळी तोडगा निघू शकला नाही. मुळात कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्याने व्यापा-यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे कांदा व्यापा-यांनी बेमुदत बंदची हाक दिली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आला. कांदा उत्पादक शेतक-यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.