पीएफवर ८.६५ टक्के व्याजास हिरवा कंदील
भविष्य निर्वाह निधीवर (पीएफ) ८.६५ टक्के व्याज मिळण्याच्या कामगार मंत्रालयाच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. २0१६-१७ या वर्षासाठी पीएफवर ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा देशातील चार कोटी ईपीएफओ सदस्यांना मिळणार आहे.
पीएफवर ८.६५ टक्के व्याज मिळावे अशी सूचना ईपीएफओ ट्रस्टीजने केली होती. हे व्याज कमी करावे, असे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे होते. व्याजदर वाढवल्यास सरकारी तिजोरीवर ताण पडेल, असे अर्थमंत्रालयाचे म्हणणे होते. ८.६५ टक्के व्याजदर देण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा निधी आहे की नाही, याकडेही लक्ष ठेवा; अन्यथा निधीची तूट पडेल, असेदेखील अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.