शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2017 (15:47 IST)

1 एप्रिलपर्यंत रजा न घेता काम करा - आरबीआय

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 1 एप्रिलपर्यंत रजा न घेता कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवार-रविवार सुट्टीच्या दिवशीही बँकांनी कामकाज सुरु ठेवावे असे रिझर्व्ह बँकेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.  सर्व सरकारी बँका आणि काही खासगी बँकांना सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरु ठेवण्यास रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.  येत्या 31 मार्चला 2016-17 हे आर्थिकवर्ष संपणार असून, 1 एप्रिलपासून नव्या आर्थिकवर्षाची सुरुवात होणार आहे.सरकारी आर्थिक व्यवहार आणि कर भरण्याची सोय उपलब्ध रहावी या हेतूने रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची काही निवडक कार्यालयेही सुरु राहणार आहेत.