Festival Posters
✕

आता या 10 जागी PAN ऐवजी देऊ शकता Aadhar नंबर

Updated: बुधवार, 16 ऑक्टोबर 2019 (12:27 IST)
 
पूर्वी 50 हजार रुपयांच्या कॅश ट्रांझेक्शनवर पॅन कार्ड नंबर देणे अनिवार्य होतं परंतू आता या प्रकाराच्या व्यवहारासाठी PAN नंबर नसल्यावर आधार नंबर देता येईल. बँकेत 50 हजार रुपयाहून अधिक कॅश जमा केल्यास आधार नंबरद्वारे देखील व्यवहार करता येईल.
 
2 लाख रुपयांहून अधिक किमतीचं सोनं खरेदी केल्यावर ज्वेलरला आपलं पॅन कार्ड द्यावं लागत होतं आता येथे देखील आधार नंबर देता येऊ शकतो.
 
कार खरेदी करताना पॅन कार्ड नंबर देणे अनिवार्य होतं पण आता आधार नंबर देता येईल.
 
सगळ्या बँक क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी ग्राहकांकडून पॅन कार्ड मागतात परंतू आता आपल्याकडे पॅन कार्ड नसल्यास आपण आधार नंबर देऊ शकता.
 
हॉटेलमध्ये बिल पेमेंट करताना आपलं बिल 50 हजार रुपयाहून अधिक झाल्यास आपण कॅश पेमेंट करू इच्छित असल्यास पॅन नंबरऐवजी आधार नंबर देऊ शकता. या प्रकारे परदेश प्रवास करताना देखील 50 हजारापेक्षा अधिक कॅश खर्च झाल्यावर आपण आधार नंबर देऊ शकता.
 
नियमांप्रमाणे इंश्योरेंस कंपनीचा प्रिमियम एका वर्षात 50 हजाराहून अधिक झाल्यावर पॅन नंबर द्यावा लागतो परंतू आता आधार नंबर देता येईल.
 
लिस्टेड नसलेल्या कंपनीचे 1 लाख रुपायाहून अधिकाचे शेअर खरेदी केल्यावर देखील आधार नंबर देता येईल.
 
नवीन नियमांप्रमाणे आता 10 लाख रुपयांहून अधिक महाग प्रापर्टी खरेदी केल्यावर पॅनऐवजी आधार नंबर देता येऊ शकतो.
 
सरकाराचे फायनेंस बिल प्रभावी झाल्यावर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आणि शेअर्सची खरेदी विक्रीमध्ये देखील पॅन कार्डाऐवजी आधार नंबर देता येईल.

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments