Dharma Sangrah
✕

‘अहमदनगर महाकरंडक’१२ जानेवारीपासून असा करा अर्ज पूर्ण माहिती

Updated: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (15:38 IST)
नरेंद्र फिरोदिया म्हणाले, स्पर्धेचे हे नववे वर्षे आहे. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आणि लाभत आहे. अहमदनगर महाकरंडक स्पर्धेमुळॆ महाराष्ट्रभरातील रंगकर्मींना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे नाट्यकलावंतांना या अहमदनगर महाकरंडक स्पर्धेची उत्सुकता असते.
सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे, सिद्धार्थ जाधव, मंगेश कुलकर्णी, श्रीरंग गोडबोले, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदीं या स्पर्धेला आत्तापर्यंत पाहुणे म्हणुन लाभले आहेत. तर केदार शिंदे, अमित भंडारी, सुजय डहाके, विजय पाटकर, किरण यज्ञोपवित, प्रवीण तरडे, हेमांगी कवी, सुनील बर्वे, अश्विन पाटील, राजन ताम्हाणे विकास कदम, मुक्ता बर्वे, विनोद लवेकर हे परिक्षक म्हणून लाभलेले आहेत.
 
अहमदनगर महाकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी दि.१२ ते १६ जानेवारी २०२२ दरम्यान रंगणार असून २० डिसेंबर २०२१ पर्यंत www.mahakarandak.com या संकेत स्थळावर प्रवेश अर्ज भरावयाचा आहे.
अहमदनगर महाकरंडकच्या वाढत्या प्रसिद्धीची दखल मराठी वाहिन्यांनीदेखील घेतलेली आहे. झी-ग्रुपच्या झी-मराठी या मराठी वाहिनीचा यावेळी महाकरंडकात सहयोग असणार आहे. त्यामुळे यावेळीची स्पर्धा अधिकच दर्जेदार आणि कसोटी पाहणारी असेल असे अहमदनगर महाकरंडकचे संयोजक स्वप्नील मुनोत यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमांना अधिन राहुन स्पर्धेच आयोजन करण्यात येणार असुन आय लव्हनगर च्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेला ऑनलाइन स्ट्रिमिंग पार्टनर म्हणून १ ओटीटी तसेच डिजीटल पार्टनर म्हणून ‘लेटस्-अप’ आणि ‘खासरे टीव्ही’ असल्याचे महावीर प्रतिष्ठानचे हर्षल बोरा यांनी सांगितले.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी आणि प्रवेश अर्जासाठी ९६०७७००८०० या क्रमांकावर अथवा विवेक जोशी : ७२७६३५५१४८, सौरभ कुलकर्णी : ९०२८१७१४४१ यांच्याशी संपर्क साधावा.

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

इम्रान हाश्मीच्या 'गनमास्टर जी९' या चित्रपटाच्या सेटवर भीषण अपघात, अभिनेता थोडक्यात बचावला

बिपाशा बसूची प्रमुख भूमिका असलेल्या प्राईम व्हिडिओच्या नवीन मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले

सात डोंगरांच्या कुशीत वसलेले सप्तशृंगी देवीचे मंदिर; नवरात्रीत येथे दर्शन घेण्याचे महत्त्व काय?

तनुश्री दत्ताचा खळबळजनक दावा; नाना पाटेकर जिवंत असल्याचा संशय व्यक्त, DNA चाचणीची मागणी चर्चेत

Sunny Deol Suryaa: सनी देओलच्या नव्या अवताराने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली

पुढील लेख
Show comments