गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जानेवारी 2019 (11:04 IST)

ठाकरेचे प्रिमियर दिग्दर्शक पानसे आणि राऊत वाद, अर्ध्यातून पानसे निघून गेले

सगळीकडे चर्चा आहे ती ‘ठाकरे’ या चित्रपटाची. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचे आज स्क्रीनिंग होते. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला ‘ठाकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित पानसे देखील आले होते. मात्र ते चित्रपटाच्या स्क्रीनिंगमधून तडकाफडकी निघाल्याची घटना घडली आहे. वडाळ्यातल्या कार्निव्हल आयमॅक्समध्ये सुरू असलेल्या या स्क्रीनिंगला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं सिनेमागृह फुल्ल झालं. अशातच चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले अभिजित पानसेंसह कुटुंबीयांना स्क्रीनिंगला बसण्यासाठी पुढच्या रांगेत जागा आरक्षित करण्यात आली होती. परंतु एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मागच्या बाजूला जागा आरक्षित ठेवण्यात येते.सिनेमागृहात बसण्यासाठी मागच्या बाजूला जागा न मिळाल्यानं अभिजित पानसे प्रचंड संतापले. त्यानंतर चित्रपटाचे निर्माते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊतांचं ऐकून न घेता 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगमधून अभिजीत पानसे कुटुंबीयांसह तडकाफडकी निघाले.