Marathi Biodata Maker

FREE HIT DANAKA : 'फ्री हिट दणका' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Updated: सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (18:34 IST)
 
उघडेवाडी गावातील धुमाकुळ पाटील आणि निगडेवाडी गावातील अण्णा पाटील या दोन पाटील घराण्यांमध्ये वैमनस्य असून धुमाकुळ पाटीलाच्या मुलाचे अण्णा पाटीलांच्या मुलीवर प्रेम असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे. आता या दोघांच्या प्रेमाचे भविष्य या दोन गावांमध्ये दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेवर अवलंबून आहे. या दोघांचे प्रेम कसे जुळते? त्यांच्या प्रेमाचे पुढे नक्की काय होते? या दोन गावांमध्ये नक्की कोणत्या कारणामुळे वैमनस्य आहे? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रेक्षकांना १७ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 
 
'फँड्री' फेम सोमनाथ अवघडे सोबत या चित्रपटात अपूर्वा एस. आहे. विशेष म्हणजे 'सैराट' चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या), सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सुनील मगरे दिग्दर्शित या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची आहे. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटाचे लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. 

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

हास्यजत्रा फेम कलाकाराचे अकस्मात निधन

बाबरीच्या जागेवर राम मंदिर उभारणीमुळे मुस्लिम मित्रांची माफी; स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!

दाऊदसोबतच्या 'त्या' फोटोवर मंदाकिनीचा मोठा खुलासा; "त्याने मला दुबईला बोलावले नव्हते"

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनंत नाग यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार प्रदान केला जाणार

राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा अभिनेत्याला कडक आदेश, इतके कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments