शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

मकरसंक्रांत सेलिब्रेटी कोट

पारंपारिक पद्धतीची संक्रांत
संक्रात हा सण माझ्यासाठी खुप स्पेशल आहे. दहा वर्षापुर्वी माझं लग्न झालं तेव्हा संक्रांत हा माझा पहिला सण होता. तेव्हापासून आजपर्यंत संक्रांतीच्या आदल्या दिवशी सासरची मंडळी आमच्या गावी बुधला जातो. बोगीच्या दिवशीचं पारंपारिक पद्धतीची भाजी आणि भाकरी अशी मेजवाणी असते. संक्रांतीच्या सकाळी आम्ही गावी गेल्यानंतर देवळात वंसासाठी जातो. आणि संक्रांतीच्या संध्याकाळी सर्व स्त्रिया एकत्र येऊन हळदी –कुंकू साजरा करतो. गावात सणाचा एक वेगळा उत्साह असतो तो दरवर्षी मी अनुभवते. कितीही मॉर्डन झालो तरी दरवर्षी संक्रांत ही आम्ही पारंपारिक पद्धतीनं आणि घरच्यांसोबत साजरी करतो.
पर्णिता तांदुळवाडकर, मिसेस इंडिया
 
सॉरी प्रेक्षकहो
लहानपणापासून आईने बनवलेले तिळाचे लाडू खाऊन आम्ही मोठे झालोय. संक्रांतीला नवीन कपडे परिधान करुन वर्षाचा पहिला सण कुटुंबासोबत साजरा करतो. संक्रांतीच्या निमित्ताने मी प्रेक्षकांना मोठा सॉरी बोलू इच्छितो. काही दिवसांपुर्वी एका मालिकेतील माझी भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली होती. ती मालिका मी माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे सोडली. मालिका सोडल्यांनतर अनेक प्रेक्षकांनी मला भेटून आणि विविध माध्यमांतून मालिका का सोडली अशी विचारणा केली, अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर आज संक्रांतच्या निमित्ताने माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना मनापासून सॉरी बोलू इच्छितो.
शेखर फडके, अभिनेता
 
संक्रांत म्हणजे नवीन संधी 
संक्रांत म्हणजे सुर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे जायला प्रारंभ करतो तो दिवस. माझ्यासाठी आयुष्यात पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठीची नवीन संधी म्हणजे संक्रांत. संकटावर क्रांतीकारी मात करुन आयुष्य सुंदर बनवण्यासाठी नवीन संधी म्हणजे संक्रांत. लहानपणी जेव्हा घरी संक्रांत साजरी व्हायची तेव्हा मी नेहमीच लाडू खाण्यासाठी पहिली खटपट करायची. असेच एकदा लहान असताना मी घाईघाईत तीळाचा पुर्ण लाडू गिळला होता. आणि तो गळ्यात अडकला होता. अथक परिश्रमानंतर तो लाडू निघाला. पण प्रत्येक संक्रांतीचा पहिला लाडू खाताना त्या लाडवाची आठवण होते. 
कल्पिता राणे, मिसेस टॅलेंटेंड इंडिया वर्ल्ड़वाई