मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 (18:12 IST)

या तारखेला 'आई कुठे काय करते' घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

'आई कुठे काय करते' ही स्टार प्रवाहवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. 4 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज करत असलेली ही मालिका आजही टीआरपी मध्ये टॉपवर आहे. संध्याकाळी साडेसात वाजता प्रेक्षक सहकुटुंब ही मालिका पाहतात. अशात मालिकेच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे 'आई कुठे काय करते' मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा आहे.
 
ही चर्चा सुरु झाल्यामागील कारण म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही काळात नवनवीन मालिका दाखल होणार आहेत. रेश्मा शिंदेच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेची सर्वत्र चर्चा सुरू असून मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आहे ज्यात दीपाला नव्या लूकमध्ये पाहून प्रेक्षकांनी खूप आनंद होत होता. शिवाय नव्या प्रोमोमधून या मालिकेची वेळ व प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
 
‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेला चॅनलने संध्याकाळी ७.३० चा स्लॉट दिला असल्याने लवकरच ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र या नवीन मालिकेसाठी स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या सुरू असलेली कोणती तरी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार किंवा सध्याच्या मालिकेची वेळ बदलली जाणार हे जाणून घेण्यात प्रेक्षक खूप उत्सुक आहे. 
 
‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की या मालिकेची वेळ बदलणार याबद्दल लवकरच अधिकृतपणे सांगितलं जाईल. मात्र तोपर्यंत मालिका निरोप घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे त्यामुळे १६ किंवा १७ मार्चला मालिकेचा शेवटचा एपिसोड टेलिकास्ट होईल असा देखील अंदाज बांधला जात आहे. 
 
दरम्यान ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असून या मालिकेत रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत असल्याचे कळत आहे मात्र तिच्याबरोबर मुख्य अभिनेता कोण हे अजून समोर आलेले नाही.
 
‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवीन मालिका १८ मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.