Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

’विशू’चेअव्यक्त मन व्यक्त करणार ‘रे मना’ See Video

Updated: बुधवार, 30 मार्च 2022 (20:23 IST)
'रे मना' हे गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात गश्मीर आणि मृण्मयी यांच्यातील अव्यक्त प्रेम नजरेने व्यक्त करत आहेत. या गाण्याचे बोल अतिशय सुंदर असून प्रेमाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देणारे हे गाणे आहे.
 

या गाण्याबद्दल चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, 'नकळत झालेल्या प्रेमाची जाणीव करून देणारे हे गाणे आहे. या गाण्यात गश्मीर आणि मृण्मयी प्रेमाची न बोलता कबुली देत आहेत. या गाण्यामुळे प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढेल. शहरी जीवनशैलीत वाढलेली आरवी जेव्हा गावातील लग्नातही तितकीच समरस होऊन जाते. इतकी मालवणची तिच्यावर जादू झाली आहे. कोकणातील लग्नघर कसे असते, याचेही या गाण्याच्या निमित्ताने दर्शन घडतेय.''
 
श्री कृपा प्रॉडक्शन्स प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोलेसोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'विशू' हा चित्रपट ८ एप्रिलपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर'बद्दल मोठी बातमी; चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

द वन' चित्रपटातील पहिले गाणे, 'समझो ना', प्रदर्शित झाले

करण जोहर राधा-कृष्णाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार; जाणून घ्या कोण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

मुस्लिम वृद्धाने अनवाणी पायांनी बघितला 'हनुमान अंश'; नीम करोली बाबांवरील श्रद्धा दिसून आली

छोट्या पडद्यावरून सुरू झालेला प्रवास, ६१ कोटी रुपयांहून अधिक कमाई! आता 'हनुमान अंश' जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार

पुढील लेख
Show comments