गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (15:42 IST)

'मी पण सचिन'चा प्रिमियर सोहळा

१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'मी पण सचिन' चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा बुधवारी जुहूच्या सनी सुपर साउंड मध्ये संपन्न झाला. यावेळी मी पण सचिन चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव, चित्रपटातील कलाकार स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर, प्रियदर्शन जाधव, कल्याणी मुळे, अनुजा साठे-गोखले, मृणाल जाधव यांच्यासह हेमंत ढोमे, मृण्मयी देशपांडे, समिधा गुरु, सौरभ गोखले, रीना अग्रवाल, सुयोग गोरे, स्वप्ना वाघमारे-जोशी हे कलाकार उपस्थित होते. शिवाय मी पण सचिन चित्रपटाचे निर्माते पुरुषोत्तम जाधव, संजय छाब्रिया, डॉक्टर लकडवला आदी मान्यवरांनी देखील या प्रीमियरला शो ला हजेरी लावली.