Dharma Sangrah
✕

मोहन जोशी म्हणतात 'मिस यु मिस'

Updated: शनिवार, 28 डिसेंबर 2019 (14:21 IST)
 
या पोस्टरमध्ये मोहन जोशी, तेजस्वी पाटील आणि नवोदित अभिनेता भाग्येश देसाई एका मजेदार पोजमध्ये दिसत आहेत. त्यांची वेशभूषा बघता सिनेमात मोहन जोशी, तेजस्वी पाटील आणि भाग्येश देसाई हाय प्रोफाइल असल्याचा अंदाज आहे. हे पोस्टर पाहून मोहन जोशींमध्ये असलेला चार्म किंचीतही कमी झाला नसून उलट या पोस्टरमध्ये ते अधिकच तरुण आणि हँडसम दिसत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन शाम निंबाळकर यांनी केले असून शाम निंबाळकर हे या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. शाम निंबाळकर यांनी यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक अनिस बाझमी यांच्यासोबत रेडी, वेलकम, नो एन्ट्री, मुबारकां, वेलकम बॅक आदी चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहेत.
 
जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, ग्रे कॅट प्रोडक्शन, आर. एस. महाडिक प्रोडक्शन आणि क्षमा एंटरटेनमेंट निर्मित 'मिस यु मिस' हा सिनेमा येत्या १७ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. सुनील रघुनाथ महाडिक, क्षमा हिप्परगेकर आणि रोहनदीप सिंग यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात मोहन जोशी, अश्विनी एकबोटे, तेजस्वी पाटील, भाग्येश देसाई आणि किशोर नांदोस्कर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अश्विनी एकबोटे यांचा 'मिस यु मिस' हा अखेरचा सिनेमा असल्याने या सिनेमाला एक भावनिक जोड देखील आहे.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

बालीमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचाचा अपघात, रुग्णालयात दाखल

करण जौहरचा शो 'Koffee with Karan' निरोप घेणार

मराठी प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकरने 'प्रहार' चित्रपटात कसाबची भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधले

पूर्वजांचे तर्पण केल्यानंतर, आध्यात्मिक शांतीसाठी या विशेष ५ मंदिरांना भेट द्या

मराठी चित्रपट 'गोंधळ' ऑस्कर २०२७ च्या शर्यतीत; ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार! मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीमचा सत्कार केला

पुढील लेख
Show comments