Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Planet Marathi : 'प्लॅनेट मराठी'ने रोवला मराठी मनोरंजनाचा झेंडा अटकेपार

Updated: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (20:31 IST)
 
यावेळी अमित देशमुख यांनी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील कन्टेन्टची प्रशंसा करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मनोरंजन क्षेत्रात विविध संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले.
 
‘विस्टास मीडिया कॅपिटल कंपनी’चे सहकार्य असलेल्या 'प्लॅनेट मराठी' चा जगभरात असलेल्या सर्व मराठी प्रक्षकांपर्यंत दर्जेदार आशय असलेले मनोरंजनात्मक कार्यक्रम पोहोचवण्याचा मानस आहे. याच कामगिरीमुळे प्लॅनेट मराठीला दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘ॲचिवर्स अवॅार्ड’ मध्ये ‘प्रॅामिसिंग रिजनल ओटीटी अवॅार्ड’ने सन्मानित करण्यात आले.
 
'एक्स्पो२०२० दुबई युएई'तील सहभागाबद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे सर्वेसर्वा अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट कन्टेन्ट देण्यासाठी 'प्लॅनेट मराठी' नेहमीच प्रयत्नशील असते. समृद्ध आणि वैभवशाली  मराठी भाषेला सातासमुद्रापार पोहोचवण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे.  'एक्स्पो२०२० दुबई युएई' सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात 'प्लॅनेट मराठी'ची निर्मिती असलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाचा प्रिमिअर आणि 'सहेला रे' या वेबफिल्मचे टीझर लॉन्च होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक चित्रपटाचा तसेच वेबसिरीजचा आशय, मांडणी खूप वेगळी असते. येथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. मराठी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी आणि मराठी भाषा सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी 'प्लॅनेट मराठी ओटीटी' कायमच कटिबद्ध आहे.''

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

'बीइंग ह्युमन' घोटाळा प्रकरणात सलमान खान आणि अलविरा खान यांना कोर्टाने समन्स बजवले

मलाइका अरोराने खरेदी केली 'महिंद्रा थार रॉक्स'; तब्बल २८ लाखांची Thar Roxx ची पूजा करतानाचा व्हिडिओ व्हायरल

१६ कोटींच्या कर्ज प्रकरणात राजपाल यादव यांच्यावरील कायदेशीर दबाव वाढला; दोन मालमत्तांचा लिलाव होणार

'छोटा बच्चा जान के' ते स्टार होस्ट बनण्यापर्यंतचा आदित्य नारायणचा रंजक प्रवास जाणून घ्या

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

पुढील लेख
Show comments