Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

PLANET MARATHI : SOPPA NASAT KAHI - एक स्त्री राहणार दोन पुरुषांसोबत ?

Updated: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (20:50 IST)
 
नुकताच 'सोप्पं नसतं काही' चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यात मृण्मयीच्या आयुष्यात शशांक आणि अभिजीत असे दोन पुरुष दिसत आहेत. त्यांच्या आयुष्यात नेमके काय होते? आता मृण्मयी या दोघांबरोबर राहणार का? की आणखी काही पर्याय निवडणार, याची उत्तरे वेबसिरीज पाहिल्यावरच मिळतील. 
 
'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रदर्शित होणाऱ्या 'सोप्पं नसतं काही' या वेबसिरीजबद्दल 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' या वेबसिरीजचा विषय आजपर्यंत मराठीत कधीही हाताळण्यात आलेला नाही. मुळात आपले मराठी प्रेक्षक खूपच चोखंदळ आहेत. नवनवीन विषयांचा ते नेहमीच स्वीकार करतात. त्यामुळे हा एक वेगळा विषयीही ते नक्कीच स्वीकारतील. आपली  कला, संस्कृती, साहित्य यांना आधुनिकतेची जोड देत ती सातासमुद्रापार पोहोचवण्याचा प्रयत्न 'प्लॅनेट मराठी ओटीटी', अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या माध्यमातून जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, नाविन्यपूर्ण व दर्जेदार कंटेन्ट देणे, ही आमची जबाबदारी आहे. 'सोप्पं नसतं काही' हा त्याचाच एक भाग आहे. या वेबसिरीजला प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देतील याची खात्री आहे.''
    
'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर ३१ ऑगस्टपासून 'सोप्पं नसतं काही' ही वेबसिरीज प्रेक्षकांना अतिशय अल्प दरात पाहता येईल.

सर्व पहा

'६ वर्षे येरवडा जेलमध्ये राहिलो, पण...'; संजय दत्तच्या 'त्या' विधानाने महाराष्ट्रात राजकीय गदारोळ!

Bigg Boss 20: 'बिग बॉस'चा २०वा सीझन मध्ये मनोज तिवारी यांची मुलगी रीतीची एन्ट्री

'लस्ट स्टोरीज ३' ची घोषणा, या तारखेला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

करण जोहर राधा-कृष्णाची कथा मोठ्या पडद्यावर आणणार; जाणून घ्या कोण करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

ईशा देओल विनोदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार! अभिनेत्री दिसणार या चित्रपटात

सर्व पहा

कॅनडामध्ये पंजाबी गायक अॅमी विर्कच्या ताफ्यावर जोरदार गोळीबार

बेदम मारहाण करत संगीतकाराची निर्घृण हत्या

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

राजपाल यादव तुरुंगवासातून सुटणार का? सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला, अनेक कोटी रुपये जमा करावे लागतील

एकेकाळी अक्षय कुमार दागिने विकायचा आणि याचमुळे त्याला पहिला चित्रपट मिळाला

पुढील लेख
Show comments