मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (16:23 IST)

राणादा पुन्हा रसिकांच्या भेटीला, नव्या मालिकेतून पुनरागमन

तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घराघरात राणादा म्हणून लोकप्रिय झालेला अभिनेता हार्दिक जोशी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
 
झी मराठी वाहिनीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या नवीन मालिकेमध्ये हार्दिक जोशी अभिनेत्री अमृता पवारसोबत झळकणार आहे.
 
३० ऑगस्टपासून रात्री ९ वाजता तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून लोकांनी त्याला पसंती दिली आहे.